Eco friendly bappa Competition
घर क्रीडा उरूग्वेचा आधार - लुईस सुआरेझ

उरूग्वेचा आधार – लुईस सुआरेझ

Subscribe

उरूग्वे… दक्षिण अमेरिका खंडातील एक देश. ब्राझील,अर्जेंटिना, चिली या फुटबॉलप्रेमी देशांच्या बाजूलाच वसलेल्या या देशात अनेक दर्जेदार फुटबॉलपटू जन्मले. फुटबॉलचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या देशाने १९३० साली आणि १९५० साली फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यानंतरच्या विश्वचषक स्पर्धांत मात्र संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. २००६ साली संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला नव्हता. २०१० च्या विश्वचषकात संघ ४ थ्या स्थानी पोहचला तर २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत संघाला १६ व्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. गेल्या ४ वर्षांत आंतरराष्ट्रीय स्पर्धांत संघ सुमार कामगिरीचे प्रदर्शन करत असताना एक खेळाडू कायम यशाच्या शिखरावर राहिला आणि तो म्हणजे लुईस सुआरेझ.

सुआरेझचे करीयरचा धावता आढावा

वयाच्या १६ व्या वर्षापासून युथ करियरला सुरूवात केलेला सुआरेझ आतापर्यंत लिवरपूल आणि आता बार्सिलोना संघासाठी खे़ळत आहे. लिवरपूलसाठी ६९ तर बोर्सिलोनासाठी ११० गोलांचे योगदान त्याने दिले आहेत. आतापर्यंत त्याने ४०० गोल केले असून १६ विजेतेपद मिळविली आहेत.२०१० च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी २३ जणांच्या संघामध्ये सुआरेझचा समावेश करण्यात आला.त्या स्पर्धेत त्याच्या खेळाला खऱ्या अर्थाने बहर आला. त्याने संघासाठी दिलेल्या योगदानाच्या बळावर उरूग्वेला स्पर्धेत ४ थ्या स्थानापर्यंत मजल मारता आली. तर २०११ साली कोपा अमेरिकन स्पर्धेत त्याची मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून निवड करण्यात आली. विश्वचषक २०१८ च्या उरूग्वेच्या संघात तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. संघासाठी त्याने ५१ गोल केले आहेत.

- Advertisement -

suarez_luis
उरूग्वेचा लुईस सुआरेझ

२०१४ चा विश्वचषकात सुआरेझ वादात

२०१४ चा विश्वचषक सुआरेझसाठी वादग्रस्त ठरला. मेक्सिको आणि इटली या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात इटलीचा डिफेन्डर चिलीनी याच्या खांद्याचा चावा घेतल्याने सुआरेझला ९ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यापासून बंदी घालण्यात आली. त्यामुळे तो २०१५ सालच्या कोपा अमेरिकन स्पर्धेसाठी मुकला. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बंदी होती. की पासेस आणि सामना संपवणे या सुआरेझच्या भक्कम बाजू आहेत. तसेच क्रासिंग, बॉलवर ताबा मिळवणे तसेच दूरवरून चेंडू वेगाने गोलपोस्टच्या दिशेने मारणे या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. परंतु, ऑफसाईडबद्दल तो दक्ष नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा गोल करण्याच्या संधी त्याने गमावल्या आहेत. २०१४ ची पुनरावृत्ती न करता संघाला विश्वविजेतेपद जिंकवून देण्याचा तो प्रयत्न करेल. त्याच्या साथीला कवानी सारखा अनुभवी स्ट्रायकर देखील आहे.
१९५० नंतर म्हणजे तब्बल ६८ वर्षांनंतर आपला संघ विश्वचषक जिंकेल अशी आशा उरूग्वेच्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि त्याची मोठी जबाबदारी सुआरेझच्या खांद्यावर आहे.

- Advertisement -

luis bite
सुआरेझ इटलीचा डिफेन्डर चिलीनी याच्या खांद्याचा चावा घेताना

- Advertisment -