घरताज्या घडामोडीLunar Eclipse 2020: आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, 'या' राशीच्या लोकांवर होणार परिणाम

Lunar Eclipse 2020: आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, ‘या’ राशीच्या लोकांवर होणार परिणाम

Subscribe

जाणून घ्या केव्हा आणि कुठे दिसेल आजचे चंद्रग्रहण

आज (३० नोव्हेंर २०२०) या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी चार तास १८ मिनिटे ११ सेकंदाचा असल्याचे सांगितले जात आहे. आज १.०४ मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. चार तासांचे हे चंद्रग्रहण सुरुवातीला उपछायेचा पहिला स्पर्श असेल. दुपारी ३.१३ मिनिटांनी हे परमग्रास चंद्रग्रहण असेल आणि ५.२२ मिनिटाला हे उपछायेचा अंतिम स्पर्श असेल. हे चंद्रग्रहण खूप महत्त्वाचे असणार आहे आणि ते रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीवर पडणार आहे.

चंद्रग्रहण कुठे दिसेल?

आजचे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, आशिया, प्रशांत महासागर आणि अमेरिकेच्या काही भागात दिसले जाऊ शकते. हे चंद्रग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी त्याचा परिणाम होऊ शकतो. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी सुतक सुरू होते, परंतु यावेळी उपछाया ग्रहण आहे. त्यामुळे यादरम्यानचा सुतक काळ वैध नसणार आहे.

- Advertisement -

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार चंद्रग्रहण वृषभ आणि रोहिणी नक्षत्रात असेल. ज्यामुळे या ग्रहणाचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या चंद्रग्रहणावेळी वृषभ राशीच्या लोकांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

ज्योतिष विद्धान म्हणतात की, ‘उपछाया चंद्रग्रहण असल्यामुळे ते इतके प्रभावी नसणार आहे. या ग्रहणाचा परिणाम देशावर आणि जगावर होणार नाही. परंतु ग्रहणामुळे लोकांच्या मानसिक स्थितीवर निश्चितच परिणाम होईल. याशिवाय आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा वेळी ग्रहणापासून वाचवण्यासाठी ज्योतिषांचे उपाय जरूर करा.’ आजच्या चंद्रग्रहणाच्या गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. एखाद्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरावर ग्रहणाचा नकारात्मक होऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – चीनच्या उलट्या बोंबा! भारतानेच जगभर पसरवला कोरोना!!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -