lunar eclipse 2021 : ५८० वर्षानंतर चंद्रग्रहणाचा असा योग, पण फक्त काही सेकंदाचा

भारतात कधी, कुठे दिसणार चंद्रग्रहण ?

Lunar eclipse 2021

शुक्रवारी कार्तिक शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी या वर्षातील शेवटचे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण दिवसा होत असल्याने भारतात दिसणार नाही. हे चंद्रग्रहण फक्त अरूणाचल प्रदेशातील काही डोंगराळ भागात अंशतः आणि अतिशय कमी वेळासाठी म्हणजे अवघ्या एका मिनिटासाठी दिसणार आहे. नासाने जाहीर केलेल्या माहितीनुसार हे चंद्रग्रहण ३ तास २८ मिनिटांचे असेल. इतक्या दीर्घ कालावधीचे चंद्रग्रहण हे ५८० वर्षानंतरच पहिल्यांदा शुक्रवारी असणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.४८ वाजता चंद्रग्रहण सुरू होईल, तर सायंकाळी ४.१७ वाजता चंद्रग्रहण समाप्त होईल.

अरूणाचल प्रदेशच्या काही डोंगराळ भागात संध्याकाळी ४.१७ वाजता काही सेकंदासाठी हे अंशतः चंद्रग्रहण पाहता येणार आहे. त्यानंतर पेनुम्ब्रल चंद्रग्रहणाची सुरूवात होईल, चे चंद्रग्रहण ५.३३ पर्यंत राहील. पेनुम्ब्रल चंद्रग्रहणात चंद्राच्या समोर धुळकट वातावरण दिसेल. या चंद्रग्रहणाचा कोणताही परिणाम नसतो.

५८० वर्षानंतर दीर्घकालीन आंशिक चंद्र ग्रहण

शुक्रवारी होणाऱ्या चंद्रग्रहणासारखेच चंद्रग्रहण याआधी २७ फेब्रुवारी १४४० रोजी पौर्णिमेच्या निमित्ताने असेच दीर्घकाळ चंद्रग्रहण चालले होते. उद्या शुक्रवारी १९ नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहण हे पश्चिम आफ्रिका, पश्चिम युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, एशिया, ऑस्ट्रेलिया, अटलांटिक महासागर येथे दिसणार आहे. ग्रहणाचा शेवट (मोक्ष) हे चंद्रोदयाच्या वेळी ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलंड, भारताच्या पूर्वोत्तर भागाच्या ठिकाणी, चीन आणि रूस याठिकाणी दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी १२.४८ वाजता सुरू होईल. चंद्रग्रहणाचा मध्य दुपारी २.२२ वाजता आणि शेवट ४.१७ वाजता होईल.

५९ वर्षानंतर गुरू शनि मकर राशीत आणि चंद्रग्रहण

गुरू शनि मकर राशीमध्ये स्थित आहे आणि आंशिक चंद्र ग्रहण होत आहे. गुरू शनि मकर राशीमध्ये असताना चंद्रग्रहणाचा योग हा २०२१ च्या आधी म्हणजे ५९ वर्षांपूर्वी १९ फेब्रुवारी १९६२ रोजी आला होता. १९ नोव्हेंबरचे चंद्रग्रहण हे वृषभ राशीमध्ये होत आहे, चंद्र याच राशीत राहण्याचे अपेक्षित आहे. जेव्हा पृथ्वीच्या प्रदक्षिणे दरम्यान सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते, अशावेळी एकाच रेषेत तिन्ही ग्रह येण्याच्या स्थितीनंतर चंद्रग्रहण होते. त्यामुळे सुर्याचा प्रकाश हा चंद्रापर्यंत पोहचत नाही आणि चंद्र त्यामुळे दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी चंद्रग्रहण होते.