घरताज्या घडामोडीLunar Eclipse 2020: आज वर्षातलं तिसरं चंद्रग्रहण संपलं

Lunar Eclipse 2020: आज वर्षातलं तिसरं चंद्रग्रहण संपलं

Subscribe

२१ जून रोजी सूर्यग्रहण लागले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा आज चंद्रग्रहण लागले होते. यंदाच्या वर्षातले तिसरे चंद्रग्रहण लागले होते. हिंदू पंचांगानुसार आज आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेला हे चंद्रग्रहण होते. आज सकाळी ८.३८ मिनिटांनी या ग्रहणाला सुरुवात झाली आणि ते ११.२१ मिनिटांनी संपलं आहे. मात्र भारतातून हे चंद्रग्रहण दिसले नसून ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका आणि आशियातील काही भागात हे चंद्रग्रहण दिस आहे.

आजचे चंद्रग्रहण उपछाया प्रकाराचे असणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात चंद्रग्रहण झालं होत. आजच्या चंद्रग्रहणाचा कालावधी सुमारे २ तास २३ मिनिटांचा होता. यादरम्यान भारतात दिवस असल्यामुळे आजचे चंद्रग्रहण देशात दिसले नाही आहे. गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहण हा अद्भूत योग मानला जातो.

- Advertisement -

जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका ओळीत असतात तेव्हा चंद्रग्रहण होतं. यावेळेस चंद्राचा एक भाग लपवला जातो तेव्हा अर्ध चंद्रग्रहण होतं. पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून चंद्राचा प्रवास होतो त्याचा उपछाया चंद्रग्रहण म्हटलं जात. ही एक खगोलीय स्थिती आहे.

शास्त्रानुसार या ग्रहणाला सुतक पाळलं जात नाही. कारण हे उपछाया चंद्रग्रहण पूर्ण ग्रहणाप्रमाणे नसतं. त्यामुळे या चंद्रग्रहणा दरम्यान मंदिर उघडी ठेवून शकता आणि पूजा देखील करू शकता. तसेच कोणतेही शुभ कार्य करू शकता.

- Advertisement -

हेही वाचा – टिकटॉकला आत्मनिर्भरतेची टक्कर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -