Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश शरीरसंबंध ठेवले, पण पल्लवीच्या संमतीनं - एम. जे . अकबर

शरीरसंबंध ठेवले, पण पल्लवीच्या संमतीनं – एम. जे . अकबर

Subscribe

पल्लवी गोगोई यांच्याशी माझे शरीरसंबंध होते आणि ते परस्पर सहमतीनं ठेवले गेले. अशी माहिती एम. जे. अकबर यांनी दिली आहे. महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी केलेल्या बलात्कारच्या आरोपावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

पत्रकार आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी आता पल्लवी गोगोई प्रकरणामध्ये नवी खुलासा केला आहे. माझ्यामध्ये आणि पल्लवीमध्ये शरीरसंंबंध होते आणि परस्पर सहमतीनं शरीरसंबंध ठेवल्याचं स्पष्टीकरण एम. जे . अकबर यांनी दिले आहे. एम. जे. अकबर यांनी बलात्कार केल्याचा आरोप महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी केला आहे. त्यावर आता एम. जे . अकबर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्यामध्ये आणि पल्लवीमध्ये परस्पर संमतीनं शरीरसंबंध होते. त्यावेळी माझ्या घरामध्ये तणाव देखील निर्माण झाला. या संबंधांमुळं अनेक चर्चा झाल्या. परस्पर संमंतीनं ठेवलेले संबंध नंतर संपवण्यात आले. २९ ऑक्टोबरला वॉशिंग्टन पोस्टने माझ्या वकिलांना प्रश्नांची मालिका पाठवली आहे. यामध्ये २३ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख करण्यात आला. शिवाय, प्रश्नांची मालिकाच पाठवण्यात आली आहे. हे सर्व आरोप खोटे आहेत असं स्पष्टीकरण एम. जे. अकबर यांनी दिली आहे.

वाचा – ‘एम. जे. अकबर यांनी माझे कपडे फाडले’, आणखी एक आरोप

एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

एम. जे. अकबर यांच्यावर आत्तापर्यंत अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. #METOO अंतर्गत हे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर एम. जे. अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर हे सारं प्रकरण सध्या न्यायालयामध्ये पोहोचलं आहे. एशियन एज या पेपरमध्ये काम करत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील एका हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी केला आहे. त्यावर अकबर यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

वाचा – #MeToo : एम जे अकबर यांचा अखेर राजीनामा

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -