घरदेश-विदेश'बॅटमॅन' आमदाराला जामीन; भाजप कार्यकर्त्यांचा गोळीबार करत जल्लोष

‘बॅटमॅन’ आमदाराला जामीन; भाजप कार्यकर्त्यांचा गोळीबार करत जल्लोष

Subscribe

मपाहापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण करणाऱ्या भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांची आज तुरुंगातून सुटका केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गोळीबार करत एकच जल्लोष केला.

मपाहापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण करणाऱ्या भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांची आज सकाळी तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटका होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गोळीबार करत जल्लोष केला. आमदार आकाश विजयवर्गीय यांना शनिवारीच जामीन मंजुर झाला होता, पण रविवारी त्यांची सकाळी १० वाजता तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आकाश यांना जामीन मंजुर झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्यांचे समर्थक खुलेआम गोळीबार करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे इंदूरमधील भाजपा कार्यालयासमोर हा प्रकार घडला आहे.

बॅटमॅनआमदार आकाश विजयवर्गीय तुरुंगातून बाहेर येताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. या व्हिडिओत त्यांचे समर्थक खुलेआम गोळीबार करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे इंदूरमधील भाजपा कार्यालयासमोर हा प्रकार घडला असून विजयवर्गीय यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. शनिवारी भोपाळच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजुर केल्याचे समजताच विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. यावेळी एक जण हातात बंदूक घेऊन हवेत गोळीबार केला आहे. इंदूर महापालिकेचे अधिकारी धिरेंद्र बायस यांना बॅटने मारहाण केल्यामुळे आकाश विजयवर्गीय यांना अटक करण्यात आली होती. शनिवारी भोपाळच्या विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन मंजुर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीमध्ये माजी महिला पत्रकारावर गोळीबार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -