घरदेश-विदेशमध्य प्रदेशात समान नागरी कायदा होणार लागू; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मध्य प्रदेशात समान नागरी कायदा होणार लागू; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

Subscribe

 दक्षिण मुंबईत 'फूड कोर्ट' च्या माध्यमातून रोजगार करणार

मध्य प्रदेशात लवकरंच समान नागरी कायदा लागू होणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली आहे. हा कायदा लागू करण्यासाठी आता मध्यप्रदेश सरकार एक समिती स्थापन करणार आहे. दरम्यान भारतात सर्वत्र समान नागरी कायदा लागू व्हावा अशी मागणीही शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

शिवराज सिंह चौहान म्हणाले की, कधी कधी मोठे खेळ होतात. स्वतःच्या नावे जमीन घेता येत नाही तेव्हा ती जमीन आदिवासींच्या नावावर घेतली जाते. आदिवासी मुलीशी लग्न करून जमीन तिच्या नावावर करून घेणारेही अनेक बदमाश आले आहेत. बरवानी येथील सेंधवामध्ये ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले की, मी आज याबाबत जनजागृती करण्यासाठी आलो आहे. मुलीचे लग्न लावून जमीन घेतली जाते. भारतात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे या वस्तुस्थितीच्या बाजूने मी आहे. एकापेक्षा जास्त लग्न का करायचे? एकाच देशात दोन संविधान का असावेत? सर्वांना नियम सारखेच असावेत.

यावेळी समान नागरी कायद्याबाबत घोषणा करत ते म्हणाले की, मी मध्य प्रदेशातही समिती स्थापन करत आहे. समान नागरी संहितेत एकच पत्नी ठेवण्याचा अधिकार असेल. सर्वांना एकच पत्नी असावी.

- Advertisement -

गुजरात आणि उत्तराखंडमध्ये घोषणा

ऑक्टोबर महिन्यात गुजरातमध्ये समान नागरी संहिता लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने ही घोषणा करण्यात आल्याचे म्हटले गेले, त्याचवेळी उत्तराखंडमध्येही निवडणुकीपूर्वी समान नागरी संहिता लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

समान नागरी कायदा नेमका काय आहे?

कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत. मग ती कोणताही जात असो वा धर्म. तुम्ही स्त्री असोत की पुरुष, कायदा सर्वांसाठी समान आहे. विवाह, घटस्फोट, दत्तक, उत्तराधिकार, वारसा याबाबत सर्वांना समान अधिकार. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, लैंगिक समानता. त्यामुळे समान नागरी कायद्याची गरज भासू लागली आहे.

युनिफॉर्म सिव्हिल कोड (UCC) म्हणजे विवाह, घटस्फोट, मुले दत्तक घेणे आणि मालमत्तेचे विभाजन यासारख्या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान नियम. याचा अर्थ- भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी, धर्म किंवा जातीचा विचार न करता समान कायदा असावा. ज्या राज्यात समान नागरी संहिता लागू होणार आहे, त्या राज्यात विवाह, घटस्फोट आणि जमीन-मालमत्तेचे विभाजन याबाबत सर्व धर्मांसाठी समान कायदा लागू असेल.


गोवंडीत गोवरच्या विशेष लसीकरण मोहिमेला सर्वाधिक प्रतिसाद, जनजागृतीसाठी मौलवींची मदत


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -