घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री Positive, जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री Positive, जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने १३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिवराज सिंह चौहान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: ट्विट करून दिली आहे. ट्विटद्वारे त्यांनी नागरिकांना, छोटीशी चूकदेखील कोरोनाला आमंत्रण देऊ शकते असे सांगत जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्यात कोरोना विषाणूची लक्षणे दिसत होती. त्यामुळे माझी टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आवाहन आहे की, माझ्या संपर्कात जे कोणी आले आहेत त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. तसेच त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घ्यावे.’

- Advertisement -

www.covid19india.org च्या आकडेवारीनुसार आतापर्यंत मध्यप्रदेशात कोरोनाचे २६ हजार २१० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकील ७९१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून १७ हजार ८६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ७ हजार ५५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: चिंतेत वाढ; देशात कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला ३१ हजारांचा टप्पा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -