अबब! ग्राहकाला आले तब्बल ३ हजार कोटींचे वीजबिल

एका घटनेत तब्बल ३ हजार ४१९ कोटी रुपयांचं बिल आल्याची माहिती समोर आली आहे. हे बिल पाहताच घरातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत खालावली. मध्य प्रदेश येथील ग्वालियर येथे राहणाऱ्या प्रियंका गुप्ता यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे वीज ग्राहकांना कधी कधी लाखो रुपायंचं बिल प्राप्त झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, एका घटनेत तब्बल ३ हजार ४१९ कोटी रुपयांचं बिल आल्याची माहिती समोर आली आहे. हे बिल पाहताच घरातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत खालावली. मध्य प्रदेश येथील ग्वालियर येथे राहणाऱ्या प्रियंका गुप्ता यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. (Madhya Pradesh family receives 3419 crore rupees electricity bill)

प्रियंका गुप्ता यांना जुलै महिन्याचं बिल प्राप्त झालं. नेहमीच हजार-दीड हजार रुपयांचं बिल यायचं. मात्र, यावेळेसचा बिलावरचा आकडा पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. ३४१९ हजार कोटी रुपयांचं बिल पाहून त्यांचे सासरे आजारी पडले. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीने याप्रकरणाची दखल घेऊन प्रियंका गुप्ता यांना योग्य बिल दिले. मानवी चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याचंही या कंपनीने मान्य केलं.

हेही वाचा – ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला आजपासून सुरुवात; अदानी, रिलायन्ससह चार कंपन्या शर्यतीत

प्रियंका गुप्ता यांचे पती संजीव गुप्ता यांनी सांगितलं की, बिल प्राप्त झाल्यानंतर आम्ही संबंधित कंपनीच्या वेबपोर्टलवरही बिल क्रॉस चेक केलं. मात्र, तिथेही एवढीच रक्कम दाखवण्यात आली होती. त्यामुळे आम्ही याप्रकरणी तक्रार केल्यानंतर कंपनीने योग्य बिल दिलं.

वीज कंपनीचे महाप्रबंधक नितिन मांगलिक यांनी याप्रकरणी दखल घेऊन मानवी चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याचं सांगितलं आहे. तसंच, याप्रकरणात जे कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचाअकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ३ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी

का घडला असा प्रकार?

एका कर्मचाऱ्याकडून ही चूक झाली आहे. या कर्मचाऱ्याने वापरलेल्या युनिटच्या जागेवर ग्राहक क्रमांक टाकला. त्यामुळे वीज बिलाची रक्कम वाढली. हा प्रकार लक्षात येताच गुप्ता कुटुंबाला १३०० रुपयांचे योग्य बिल देण्यात आले.