घरदेश-विदेशमध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचं दीर्घ आजाराने निधन

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचं दीर्घ आजाराने निधन

Subscribe

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचं आज सकाळी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं. लालजी टंडन यांचा मुलगा आशुतोषने टि्वट करुन ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून टंडन आजारी होते. त्यांच्यावर लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी ५.३० च्या सुमारास लालजी टंडन यांनी अखेरचा श्वास घेतला. लालजी टंडन यांच्यावर लखनऊच्या गुलाला घाट येथे आज सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती आशुतोष टंडन यांनी दिली.

- Advertisement -

लालजी टंडन यांना मागिल आठवड्यात लखनऊच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यांचं फुप्फुस, किडनी आणि लिव्हर व्यवस्थित काम करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती, असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.

श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होत असल्याने तसंच ताप आल्याने लालजी टंडन यांना सर्वप्रथम ११ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. “लालजी टंडन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं तसंच त्यांचं डायलासिस सुरु होतं,” असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल करताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -