घरदेश-विदेशसत्ता येताच काँग्रेसने मध्य प्रदेशात केली कर्जमाफी

सत्ता येताच काँग्रेसने मध्य प्रदेशात केली कर्जमाफी

Subscribe

काँग्रेसने कन्या विवाह योजनेच्याअंतर्गत देण्यात येणारी रक्कम वाढून ५१ हजार करण्यात आली आहे. त्याचसोबत मध्यप्रदेशमध्ये चार गारमेंट पार्क बनवण्यातच्या प्रस्तावाला देखील मंजूरी देण्यात आली आहे.

मध्य प्रदेशच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे. मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षऱ्या केल्या. निवडणुक प्रचारा दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते की, मध्यप्रदेशमध्ये जर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर १० दिवसाच्या आत शितकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात येईल.

- Advertisement -

२ लाखांपर्यंत कर्जमाफ

शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत आणि सरकारी बँकेद्वारे घेण्यात आलेले २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्याचसोबतच कन्या विवाह योजनेच्याअंतर्गत देण्यात येणारी रक्कम वाढून ५१ हजार करण्यात आली आहे. त्याचसोबत मध्यप्रदेशमध्ये चार गारमेंट पार्क बनवण्यातच्या प्रस्तावाला देखील मंजूरी देण्यात आली आहे.

सर्व राज्यांचा केला अभ्यास

कृषी विभागाने पंजाब, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रच्या पध्दतीचा वापर करुन हा रिपोर्ट तयार केला आहे. काँग्रेसच्या वचनपत्रामध्ये सर्वात मोठा मुद्दा कर्जमाफीचा आहे. राहुल गांधी याला लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा बनवू इच्छित आहेत. आणि याचमार्फत काँग्रेसशासित राज्यांमध्ये कर्जमाफी प्राथमिक स्वरुपात केली जात आहे. काँग्रेसला बहुमत मिळताच कृषी, सहकारिता आणि वित्त विभागाने याची तयारी सुध्दा सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -