मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता आली तर सरकारी इमारतीत RSSच्या शाखांना बंदी

मध्यप्रदेशात सत्ता आली तर सरकारी इमारत आणि परिसरामध्ये आरएसएसच्या शाखा स्थापन करण्यास बंदी घालण्यात येईल अशी घोषणा केली. विशेष म्हणजे या वचननाम्यातून काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कारही केला आहे.

madhya pradesh manifesto congress
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा वचननामा

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वचननामा शनिवारी जाहीर केला आहे. या घोषणापत्राला काँग्रेसने वचन पत्र असे नाव दिले आहे. या घोषणापत्रातून त्यांनी लोकांना अनेक आश्वासन दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी मध्यप्रदेशात सत्ता आली तर सरकारी इमारत आणि परिसरामध्ये आरएसएसच्या शाखा स्थापन करण्यास बंदी घालण्यात येईल अशी घोषणा केली. विशेष म्हणजे या वचननाम्यातून काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कारही केला आहे.

संघाची शाखा उभारण्यास बंदी

काँग्रेसच्या वचननाम्यामध्ये मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यास सरकारी इमारती आणि परिसरात संघाला शाखा उभारण्यास मनाई केली जाईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या शाखेत भाग घेण्याची परवानगी देणारा सरकारी अध्यादेश रद्द करण्यात येईल, असं आश्वासनही या वचननाम्यातून देण्यात आलं आहे. संघ देशवासीयांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता

आरएसएसच्याविरोधात दुष्प्रचार सुरु

भाजपने देखील काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी आणि त्यांची पार्टी आरएसएसच्या नावावर फक्त अल्पसंख्यांक आणि अन्य लोकांच्यामध्ये दुष्प्रचार करत आहे. राहुल गांधीवर टीका करताना भाजपचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी सांगितले आहे की, राहुल गांधी अशा ठिकाणी जातात जिथे देशाच्या विरोधात घोषणा केली जाते, अशी टीका अग्रवाल यांनी केली आहे.

काँग्रेसने माफी मागावी

दरम्यान भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील काँग्रेसवर निशाना साधला आहे. असे वाटते की, काँग्रेसचे याकाळात फक्त एकच लक्ष्य आहे. मंदिर बांधून देणार नाही, शाखा चालून देणार नाही. पात्रा यांनी सांगितले की, ज्या पध्दतीने संघ काम करत आहे त्यांच्या नावावर राजकारण करणे शोभा देत नाही. एका सामाजिक संघटनेला राजनितीक संघटना म्हणण्याची चूक काँग्रेसचे नेते करत आहे. त्यासाठी त्यांना माफी मागावी लागेल.