घरदेश-विदेशकाँग्रेसच्या मंत्री भाषण वाचू शकल्या नाहीत; व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसच्या मंत्री भाषण वाचू शकल्या नाहीत; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

लोकांना संबोधित करण्यासाठी इमरती देवी भाषणासाठी उभ्या राहिल्या. पण त्यांना लिहून दिलेले भाषण वाचता आले नाही. त्यांच्या शेजारी उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली. त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच भाषण वाचायला सांगितले.

मध्य प्रदेशच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारच्या मंत्र्यांना भाषण वाचता न आल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मंत्री इमरती देवी सहभागी झाल्या होत्या. इमरती देवी भाषणाला उभ्या राहिल्या खऱ्या पण त्यांना कागदावर लिहून आणलेले भाषण वाचता आले नाही. त्यामुळे त्यांनी ते जिल्हाधिकाऱ्यांना वाचायला दिले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर आता काँग्रेस सरकारवर टीका केली जात आहे.

- Advertisement -

भाषण सोशल मीडियावर व्हायरल

इमरती देवी या कमलनाथ सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत. इमरती देवी ग्वालियर जिल्हा मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थत राहिल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान, उपस्थित लोकांना संबोधित करण्यासाठी इमरती देवी भाषणासाठी उभ्या राहिल्या. पण त्यांना लिहून दिलेले भाषण वाचता आले नाही. त्यांच्या शेजारी उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली. त्यानंतर इमरती यांनी जिल्हाधिकारी पुढचे भाषण वाचतील असे सांगितले आणि स्वत: जावून बसल्या.

मी दोन दिवसापासून आजारी

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इमरती देवी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी असे सांगितले आहे की, ‘मी गेल्या दोन दिवसापासून आजारी आहे. तुम्ही डॉक्टरांना देखील विचारु शकता. मात्र सगळं ठिक आहे. कलेक्टरने चांगल्या पध्दतीने भाषण वाचले.’ इमरती देवींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

ज्योतिरादित्या सिंधिया आमचे देव

कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळामध्ये २८ मंत्री असून त्यामध्ये दोन महिला मंत्री आहेत. इमरती देवी त्यामधील एक आहेत. इमरती देवी ग्वालियरच्या डबराच्या आमदार आहेत. इमरती देवी याआधी देखील चर्चेत आल्या आहेत. मंत्रीपदाच्या शपथविधीनंतर त्यांनी काँग्रेस नेते आणि पूर्व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांना फक्त नेते नाही तर देव असल्याचे सांगितले होते. त्यांनी असे सुध्दा म्हटले होते की, ‘मी ज्योतिरादित्य सिंधिया यांची पूजा करते’. या घटनेनंतर आज पुन्हा एकदा इमरती देवी चर्चेमध्ये आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -