घरCORONA UPDATEपोलिसाचे रजेसाठी भन्नाट कारण; म्हणे, 'म्हशीचे उपकार फेडण्यासाठी हवी आहे सुट्टी'!

पोलिसाचे रजेसाठी भन्नाट कारण; म्हणे, ‘म्हशीचे उपकार फेडण्यासाठी हवी आहे सुट्टी’!

Subscribe

कोरोनाच्या काळात पोलीस आणि आरोग्य कर्मचारी २४ तास ड्युटीवर आहेत. यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. अशातच सुट्टीवर जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. पोलीस आपापली कारणं पुढे करत सुट्ट्या मागत आहेत. मध्य प्रदेशमध्ये एका पोलिसाने सुट्टीसाठी केलेला अर्ज सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या कर्मचाऱ्याने दिलेले कारणही तितकेच मजेशीर आहे.

हेही वाचा – भारताकडे ४० वर्षांपूर्वीच कोरोनाचे रामबाण औषध? विश्वविद्यालयाचा दावा

- Advertisement -

मध्य प्रदेशातील रीवा येथे पोलीस कर्मचारीने रजेसाठी अर्ज केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या म्हशीला त्याची गरज असल्याचे म्हटले आहे. याकरता त्याला रजा मिळावी अशी विनंतीही त्याने केली आहे. स्पेशल आर्म्ड फोर्सच्या एका पोलीस हवालदाराने हा अर्ज केला असून त्याने सहा दिवसांची रजा मागितली आहे. रजेच्या अर्जात त्याने म्हटले आहे की, म्हशीची काळजी मला घ्यायची आहे. तिने केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची ही वेळ आहे. तसेच आईचीही तब्येत गेल्या दोन महिन्यांपासून बरी नाही. पुढे त्याने अर्जात नमूद केले आहे की, माझ्या घरामध्ये एक म्हैस आहे. तिने नुकतेच एका रेडकूला जन्म दिला आहे. तिची काळजी घेणारे दुसरे कोणीही नाही. म्हशीचे दूध पिऊन मी पोलिसात भरती झालो. तिने नेहमीच माझी मदत केली आहे.

आता तिच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली आहे. यासाठी मला सहा दिवसांच्या रजेची गरज आहे. यामध्ये मी आईवर उपचार करून शकेन तसेच म्हशीची ही काळजी घेऊ शकेन. या त्यांच्या वरिष्ठांनी विचार करून रजेचा अर्ज स्विकार करू असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -