घरदेश-विदेशMP: कॉंग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा! १२ दिवसांत ३ जणांनी सोडला पक्ष

MP: कॉंग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा! १२ दिवसांत ३ जणांनी सोडला पक्ष

Subscribe

मध्य प्रदेशातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला चांगले दिवस राहिले नाही

मध्य प्रदेशातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला चांगले दिवस राहिले नाही. कारण १२ दिवसांत कॉंग्रेस पक्षाच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. खंडवा जिल्ह्यातील मांधाता विधानसभेतील कॉंग्रेसचे आमदार नारायण पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा यांनी स्वीकारला आहे.

यापुर्वी कॉंग्रेसचे आमदार प्रद्युम्न लोधी आणि सावित्री देवी कसडेकर यांनीही राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सावित्रीदेवी यांनी राजीनामा दिल्यानंतर परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत म्हणाले होते की, अजून काही आमदार कॉंग्रेस पक्षाला राम राम करतील. त्याचवेळी राजीनामा दिल्यानंतर नारायण पटेल यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट देखील घेतली.

- Advertisement -

मध्य प्रदेशात १० मार्च रोजी कॉंग्रेसच्या २२ आमदारांनी पक्षातून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अखेर अल्पसंख्याकातील तत्कालीन कमलनाथ सरकार आणले. यानंतर १२ जुलै रोजी बडा मलहरा येथील कॉंग्रेसचे आमदार प्रद्युम्न सिंह लोधी आणि १७ जुलै रोजी नेपानगर मधील कॉंग्रेसचे आमदार सुमित्रा देवी कसडेकर यांनीही राजीनामा दिला होता. २३ जुलै रोजी मांधाता आमदारांनीही स्वत:ला कॉंग्रेसपासून दूर केले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

अशा प्रकारे, मार्चपासून २५ जणांना पक्षातून आपला राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशातील २७ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. या राजीनाम्यांनंतर आता कॉंग्रेसकडे ८९ आमदार आहेत, तर २३० सदस्यांच्या सभागृहात भाजपाकडे १०७ आमदार आहेत. इतर ७ आमदार व अपक्ष आहेत तर २७ जागा रिक्त आहेत. पोटनिवडणूक होत असलेल्या २ जागांपैकी दोन जागा आमदारांच्या मृत्यूमुळे रिक्त झाल्या, तर इतर २५ जणांनी स्वत: चे सदस्यत्व सोडले आहे.


पाकिस्तानने कुलभूषण जाधवच्या मदतीचे मार्ग रोखले – परराष्ट्र मंत्रालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -