घरताज्या घडामोडीधक्कादायक! भावाला विहिरीत फेकून तरुणीवर केला सामुहिक बलात्कार!

धक्कादायक! भावाला विहिरीत फेकून तरुणीवर केला सामुहिक बलात्कार!

Subscribe

मध्य प्रदेशमध्ये सात आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आजूबाजूला एक खबबळ उडाली आहे.

एकीकडे देश कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करत आहे. तर दुसरीकडे याच दरम्यान अनेक धक्कादायक गुन्हे घडताना दिसत आहे. दरम्यान मध्य प्रदेशमधील बेतुल जिल्ह्यात १८ वर्षीय तरुणींच्या भावाला विहिरीत फेकून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेतुल जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे २० कि.मी अंतरावर असलेल्या पाढर पोलिस ठाण्यातील क्षेत्रातून तरुणी आपल्या भावासोबत बाईकवरून आपल्या गावी परतत होती. तेव्हा आरोपींनी पीडितेच्या भावाला मारहाण केली आणि त्याला विहिरीत फेकून दिले. त्यावेळेस तो कसाबसा विहिरीतून बाहेर आला आणि त्याने आपला जीव वाचवला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत.

कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी राजेंद्र धुर्वे यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनुसार बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास तिच्यावर सात आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. तिचा भाऊ कसाबसा जीव वाचवून विहिरीतून बाहेर पडून गावात पोहोचला. मग त्याने ग्रामस्थांना जाऊन सर्व घटनेची माहिती दिली आणि मग सर्व ग्रामस्थांसह पीडित तरुणीने कोतवाल पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली.

- Advertisement -

याप्रकरणातील सात आरोपींपैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन आरोपी आहे. दोन आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि एससी-असटी कायद्यातील कलम ३७६, ३६५, ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.


हेही वाच – धक्कादायक! तरूणाने आई-वडिलांसह ६ नातेवाईकांना मारले ठार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -