घरताज्या घडामोडीमध्यप्रदेश : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डोळ्यांना गंभीर इजा

मध्यप्रदेश : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डोळ्यांना गंभीर इजा

Subscribe

मध्यप्रदेशमध्ये एका ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

देश एकीकडे कोरोना संकटांचा सामना करत आहे. मात्र, दुसरीकडे अशा परिस्थितही अनेक गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. मध्यप्रदेशमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सहा वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार करुन पीडितीच्या डोळ्याला गंभीर जखम केल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

मध्य प्रदेशच्या दमोह गावात बुधवारी एक चिमुरडी आपल्या घराबाहेर खेळत होती. त्या दरम्यान, एका अज्ञाताने पीडित मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या डोळ्यांनाही या आरोपींनी इजा पोहोचवली. त्यानंतर ही चिमुरडी बेशुद्ध झाली. त्यानंतर त्या आरोपींनी त्या पीडितीला तिच्या घरापासून काही अंतरावर आणून ठेवले. दरम्यान, चिमुरडीचा शोध घेतला असता ती चिमुरडी त्याठिकाणी आढळली. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नंतर या मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या डोळ्यांना झालेली दुखापत फार गंभीर होती. त्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिच्या डोळ्यांना झालेली दुखापत पाहून तिची इजा ही इतकी भयंकर आहे की, डॉक्टरांना तिच्या डोळ्यांची तपासणीही करता आलेली नाही.

- Advertisement -

या घटनेची मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपींना कडक शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: अखेर ‘त्या’ ६ महिन्याच्या बाळाची मृत्युशी झुंज अपयशी ठरली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -