Homeक्राइमMadras HC : कार्यालयातील नकोसे वर्तनसुद्धा लैंगिक छळच, मद्रास हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

Madras HC : कार्यालयातील नकोसे वर्तनसुद्धा लैंगिक छळच, मद्रास हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

Subscribe

एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या इंटरनल कम्प्लेन्ट कमिटीने (आयसीसी) एका वरिष्ठ कर्मचाऱ्याविरुद्ध काढलेल्या लैंगिक छळाचे निष्कर्ष रद्द करणाऱ्या कामगार न्यायालयाचे आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल केले.

(Madras HC) चेन्नई : कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या मुद्द्यावर मद्रास उच्च न्यायालयाने अलिकडेच एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. एका खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने कार्यालयांमध्ये होणाऱ्या लैंगिक छळाच्या व्याख्येची व्याप्ती वाढवली आहे. लैंगिक छळाच्या बाबतीत, एखाद्या व्यक्तीचे वर्तन हे त्याच्या मूळ हेतूपेक्षाही जास्त महत्त्वाचे असते. कामाच्या ठिकाणी नकोसे (unwanted) वाटणारे वर्तन हेही लैंगिक छळच आहे. या वर्तनामागील पुरुषाचा हेतू काहीही असला तरी, तो लैंगिक छळच म्हणता येईल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणात अमेरिकन न्यायालयाच्या निर्णयाचाही हवाला न्यायमूर्ती आर एन मंजुळा यांनी सुनावणीदरम्यान दिला.

एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या इंटरनल कम्प्लेन्ट कमिटीने (आयसीसी) एका वरिष्ठ कर्मचाऱ्याविरुद्ध काढलेल्या लैंगिक छळाचे निष्कर्ष रद्द करणाऱ्या कामगार न्यायालयाचे आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल केले. या वरिष्ठ कर्मचाऱ्याने आपल्या उच्च पदाचा गैरवापर केला आणि काम करत असताना आमच्या मागे उभे राहून, खांद्याला स्पर्श करण्याचा आणि जबरदस्तीने त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार त्या कर्मचाऱ्याच्या हाताखाली काम करणाऱ्या तीन महिलांनी केला होता. मात्र, त्या कर्मचाऱ्याने हे आरोप नाकारले. आपण सुपरवाझर पदावर होतो आणि फक्त या महिला कर्मचाऱ्यांच्या मागे उभे राहून त्यांचे काम पाहत होता, असे सांगतानाच, यामागे लैंगिक अत्याचार करण्याचा हेतू असल्याचा त्याने इन्कार केला.

हेही वाचा – Sharad Pawar on Amit Shah : हे कोल्हापूरचे संस्कार नाहीत, पवारांचा अमित शहांवर निशाणा

तथापि, न्यायालयाने त्या कर्मचाऱ्याचा युक्तिवाद फेटाळून लावला. एखादी गोष्ट महिलांना नकोशी (unwanted) वाटत असेल किंवा एखाद्या महिलेला तसे वाटत असेल, तर ती लैंगिक छळाच्या व्याख्येत येईल, यात तीळमात्र शंका नाहीस, असे न्यायालयाने स्पष्ट केले. लैंगिक छळाची व्याख्या POSH कायद्यात (Prevention of Sexual Harassment Act) पुरुषाच्या हेतूपेक्षा त्याचा इरादा काय आहे, याला जास्त महत्त्व दिले आहे. एकत्र काम करणाऱ्या पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे ही मूलभूत शिस्त आणि समज महत्त्वाची असून हेच सभ्यतेचे वर्तन आहे, अशी पुस्तीही न्यायालयाने जोडली. (Madras HC: High Court observations on sexual harassment in office)

हेही वाचा – Sanjay Raut On Shah : शहांना समांतर शिवसेना निर्माण करायची आहे, काय म्हणाले संजय राऊत