घरताज्या घडामोडीमाजी PM राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याला ३० दिवसांचा पॅरोल

माजी PM राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याला ३० दिवसांचा पॅरोल

Subscribe

देशाचे माजी पंतप्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी असलेला ए. जी. पेरारिवलन याला गुरुवारी मद्रास उच्च न्यायालयाने ३० दिवसांची पॅरोल दिली आहे. तो २९ वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. न्यायमूर्ती एन किरुबाकरन आणि पी वेलमुरुगन यांनी तमिळनाडू सरकारला यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने म्हटले आहे की, ‘सरकार दोषीला पॅरोल मंजूर करण्यासाठी तुरुंगातील नियमात उपलब्ध असलेल्या सवलतीनुसार पेरारिवलन याला सोडण्यास नकार देत आहे.’ दरम्यान राज्य सरकारने पेरारिवलन याची आई अरुपथमलद्वारे केलेली याचिका नाकारली होती. कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून मुलाल ९० दिवसांचा पॅरोल देण्यात यावा, अशी मागणी दोषीच्या आईने केली होती. आता न्यायालयाने याप्रकरणात ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे.

- Advertisement -

राजीव गांधी हत्येप्रकरणी पेरारिवलनसह आणखी सहा जण २९ वर्षांपासून शिक्षा भोगत आहेत. यामध्ये दोषी व्ही. श्रीहरन उर्फ मुरुगन, व्ही. श्रीहरनची पत्नी टी. सुतेंद्रराज अलैह संथान, जयकुमार, रॉबर्ट पायस, रविचंद्रन आणि नलिनी श्रीहरन हे आहेत. यामध्ये भारतीय आणि श्रीलंकेच्या लोकांचा समावेश आहे.

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी जेव्हा त्यांनी तमिळनाडूला भेट दिली तेव्हा त्यांची हत्या करण्यात आली होती. मानवी बॉम्बद्वारे त्यांची हत्या करण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – राफेल स्क्वॉड्रॉनचा पहिला मान मिळवणारी पायलट आहे तरी कोण ?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -