घरदेश-विदेशहॉटेलला 'जातीवाचक' नाव देण्यात काही गैर नाही - मद्रास हायकोर्ट

हॉटेलला ‘जातीवाचक’ नाव देण्यात काही गैर नाही – मद्रास हायकोर्ट

Subscribe

हॉटेल किंवा एखादा कॅफे सुरु करताना त्याचं नाव काय ठेवायचं हा खूप महत्वाचा प्रश्न असतो. कारण बरेचदा तुम्ही हॉटेलला दिलेल्या ‘त्या’ नावावरुन समस्या निर्माण होऊ शकते. आपल्याकडे एखाद्या हॉटेलचं नाव कुणाच्या भावना दुखावणरं किंवा विशिष्ट जाती-धर्माचा अवमान करणारं आहे, असं आढळल्यास त्यातून खूप मोठा वाद, मतभेद उद्भवू शकतात. गेल्या काही दिवसांपासून असंच एक प्रकरण चर्चेत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

तिरुचिरापल्लीच्या एका व्यावसायिकाने आपल्या हॉटेलचं नाव ‘श्री कृष्ण अय्यर ब्रहमानाल कॅफे’ असं ठेवलं आहे. या नावावरुन जातीयवादाला खतपाणी घातलं जात असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अशाप्रकारचं नाव कॅफेला देणं योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी मद्रास हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मंगळवारी मद्रास हायकोर्टाने याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला.

- Advertisement -
‘जातीवाचक’ नाव ठेवणं मालकाचा अधिकार

मद्रास हायकोर्टाच्या निर्णयानुसार, जाती वरुन एखाद्या हॉटेलला किंवा कॅफेला नाव देण्यात काहीच गैर नाही. हॉटेलच्या मालकाला असं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जस्टिस जीआर स्वामिनाथन यांच्या म्हणण्यानुसार ‘श्री कृष्ण अय्यर ब्रहमानाल कॅफे’ या नावावर आक्षेप घेणं हे केवळ ढोंग आहे. हॉटेलचे मालक त्यांना योग्य वाटल्यास विशिष्ट जाती वा धर्माचं प्रतिनिधत्व करेल असं नाव आपल्या हॉटेलला देऊ शकतात. संविधानातील कलम १९ (१) आणि १९ (२) मध्ये हॉटेल मालकाला याबाबतचा मूलभूत हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे याविरुद्ध कोर्टामध्ये कोणीच याचिका दाखल करु शकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -