Homeताज्या घडामोडीMahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात अदानींकडून मोठी मदत; दररोज 1 लाख...

Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात अदानींकडून मोठी मदत; दररोज 1 लाख भाविकांना वाटणार महाप्रसाद

Subscribe

प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पडणार आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल 12 वर्षांनंतर हा महाकुंभ मेळा पार पडत असून त्यासाठी सर्व तयारी केली जात आहे. या महाकुंभ मेळ्यात येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकराची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

मुंबई : प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पडणार आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल 12 वर्षांनंतर हा महाकुंभ मेळा पार पडत असून त्यासाठी सर्व तयारी केली जात आहे. या महाकुंभ मेळ्यात येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकराची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. अशात, उद्योगपती गौतम अदानी यांनीही या महाकुंभ मेळ्यात मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार, महाप्रसादाचे आयोजन केले असून, दररोज 1 लाख भाविकांना हा महाप्रसाद दिला जाणार आहे. (Mahakumbh 2025 Adani great cooperation in mahakumbh Mahaprasad will be distributed to 1 lakh devotees daily in Prayagraj)

मिळालेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुपने इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेसच्या (इस्कॉन) सहकार्याने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सेवेअंतर्गत, दररोज सुमारे 1 लाख भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. या महाप्रसादात रोटी, डाळ, भात, भाज्या आणि मिठाईचा समावेश असेल. याशिवाय, अदानी ग्रुप विशेषतः दिव्यांग, वृद्ध आणि मुलांसाठी मेळ्यात फिरण्यासाठी गोल्फ कार्ट सुविधा देखील प्रदान करेल. तसेच, महाप्रसादासाठी 18 हजार स्वच्छता कर्मचारी देखील असणार आहेत.

अदानी समूहाकडून गोरखपूर येथील गीता प्रेससोबत भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीत सुमारे 1 कोटी आरती संग्रहाची पुस्तके छापली जाणार आहेत. या आरती संग्रहात शिव, लक्ष्मी, गणेश, विष्णू, दुर्गा आणि इतर देवी-देवतांना समर्पित भक्तीगीते समाविष्ट आहेत. महाकुंभ मेळ्यात ही पुस्तके मोफत वाटली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या महाकुंभात सुमारे 40 कोटी भाविक उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, हा मेळा 6 हजार 382 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये आयोजित केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

महाकुंभमेळा प्रमुख स्नान

  • 13 जानेवारी – पौष पौर्णिमा स्नान (उद्घाटन दिन)
  • 15 जानेवारी – मकर संक्रांती स्नान
  • 29 जानेवारी – मौनी अमावस्या स्नान (शाही स्नान)
  • 3 फेब्रुवारी – वसंत पंचमी स्नान (शाही स्नान),
  • माघी पौर्णिमा स्नान
  • 12 फेब्रुवारी – महाशिवरात्री स्नान (समाप्ती दिवस)

दरम्यान, दर 12 वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे महाकुंभ आयोजित केला जातो. महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम मानला जातो. ज्यामध्ये जगभरातून लाखो भाविक संगमात स्नान करण्यासाठी येतात. पवित्र नदीत स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते.


हेही वाचा – Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात विशेष सुरक्षाव्यवस्था; फायर फायटिंग बोट घाटांवर तैनात