प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे संक्रांतीच्या दिवशी महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली. यासाठी जगभरातून कोट्यवधी साधू-संत तसेच भाविकांनी येथे गर्दी केली आहे. महाकुंभमेळ्याचे हे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व एका बाजूला तर यामुळे होणारा आर्थिक फायदा देखील आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. यावेळी महाकुंभ मेळ्यातून 4 लाख कोटींहून अधिक फायदा होण्याचा अंदाज आहे. (mahakumbh 2025 will boost gdp and economy devotees are ready to spend 4 lakh crores)
45 दिवस चालणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी जवळपास 40 कोटींहून अधिक लोक येण्याची शक्यता आहे. या महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 7 हजार कोटी रुपयांचे बजेट दिले आहे. जवळपास 4 हजार हेक्टर जागेवर आयोजित करण्यात आलेल्या या महाकुंभमेळ्याचा समारोप 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणार आहे. या महाकुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशातील अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून त्यांना 2 लाख कोटींचा फायदा होईल. येथे एकत्र येणारे 40 कोटी लोक सरासरी 5 हजार रुपये खर्च करतील. यामुळे उत्तर प्रदेश सरकारचा फायदा होणार आहे.
देशाच्या GDP मध्येही होणार वाढ
या महाकुंभमेळ्यात प्रत्येक व्यक्ती सरासरी 10 हजार रुपये खर्च करण्याची शक्यता असल्याचे, एका वृत्तसंस्थेने या क्षेत्रातील जाणकारांच्या हवाल्याने म्हटले आहे. तसे झाल्यास 2 लाख कोटींची ही रक्कम जवळपास 4 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे देशाच्या जीडीपी मध्ये देखील जवळपास 1 टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे.
2019 च्या अर्धकुंभात किती नफा
2019 मध्ये प्रयागराज येथेच झालेल्या अर्धकुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत जवळपास 1.2 लाख कोटींची भर पडल्याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. तेव्हा जवळपास 24 कोटी भाविक तेथे उपस्थित होते. यंदा तर जवळपास 40 कोटी भाविक आले आहेत. यामुळेच 2 लाख कोटींचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – Thackeray on Shah : या महाराष्ट्रात अमित शहांनी XX आणि गांडुळांची पैदास, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
दर 12 वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभमेळ्याची खासियत म्हणजे तब्बल 144 वर्षांनी या कुंभमेळ्यात एक खास योगायोग जुळून आला आहे. यासाठी थेट परदेशातूनही भाविक आले आहेत. रशिया, अमेरिका येथूनही अनेकजण आले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी पॅकेज्ड फूडसह पाणी, बिस्किटे यासोबतच दिवे, तेल, उदबत्त्या, धार्मिक पुस्तके अशा गोष्टी विकत घेतील. याशिवाय राहणे आणि फिरण्यावरही बराच खर्च होईल. आणि पर्यायाने राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल.
हेही वाचा – Nana Patole : संजय राऊत आमचा विषय नसल्याचे सांगत नाना पटोलेंचा पलटवार