Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशMahakumbh : महाकुंभमेळ्यावरून परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात 6 ठार

Mahakumbh : महाकुंभमेळ्यावरून परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात 6 ठार

Subscribe

नवी दिल्ली : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशामध्ये गंगास्नान करण्यासाठी देशभरातील लाखो भाविक प्रयागराजला जात आहेत. कुंभमेळ्याला जाऊन गंगास्नान करण्यासाठी भाविकांची ओढ पाहायला मिळत असून तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. कुंभमेळ्यातील पवित्र कुंडामध्ये स्नान करून आनंद आणि समाधान या भाविकांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा, रस्ते वाहतूक आणि विमानसेवेचादेखील मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. रेल्वे आणि विमानसेवा वेटिंगवर असून रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अशामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने गाडी करून प्रयागराजला जाण्याचे प्रयत्न करत आहेत. यावेळी, अनेक अपघातांच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. (Mahakumbh 6 dead and 2 injured while returnees collides with bus in jabalpur)

हेही वाचा : Hit N Run Deaths : मुंबईतील हिट अँड रनच्या घटना वाढल्या, समोर आली धक्कादायक आकडेवारी 

महाकुंभमेळ्यावरून परतत असताना एका गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी (24 फेब्रुवारी) समोर आली. या अपघातात 6 जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाऊन परत येत असताना मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यामधील सिहोरा येथे अपघाताची घटना घडली. टेम्पो ट्रॅक्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक तोडून पलीकडच्या रस्त्यावर गेलेल्या टेम्पो ट्रॅक्सला बसची धडक बसली. या भीषण अपघातात बेळगाव जिल्ह्यातील 6 जण जागीच ठार झाले आहेत. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे 4 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात ठार झालेल्या प्रवाशांमध्ये भालचंद्र नारायण गौडर (वय 50, रा. गोकाक) सुनील बाळकृष्ण शेडशाळ (वय 45, रा. हत्तरकी-आनंदपुर गोकाक), बसवराज निरपादप्पा कुर्ती (वय 63, रा. गोकाक), बसवराज शिवाप्पा दोडमणी (वय 49, रा. गोकाक), इराण्णा शंकराप्पा शेबिनकट्टी (वय 27, रा. गुळेदगुड्ड) आणि वीरूपक्ष चन्नाप्पा गुमती (वय 61, रा. गोकाक) अशी नावे आहेत. तर, मुस्ताक शिंधिकुरबेट आणि सदाशिव उपदली हे अपघातात गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.