Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशMahakumbh : महाकुंभात नाविक कुटुंबाने कमावले 30 कोटी, मुख्यमंत्री योगींनी सांगितली यशोगाथा

Mahakumbh : महाकुंभात नाविक कुटुंबाने कमावले 30 कोटी, मुख्यमंत्री योगींनी सांगितली यशोगाथा

Subscribe

नवी दिल्ली : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत महाकुंभमेळ्यात 45 दिवसांमध्ये 30 कोटी रुपये कमावणाऱ्या एका नाविक कुटुंबाची यशोगाथा सांगितली. मुख्यमंत्र्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही पण गुरुवारी खलाशाचे कुटुंब पुढे आले. बुधवारी प्रयागराजमधील अरैल येथे राहणाऱ्या पिंटू महारा कुटुंबाच्या घरी माधामांनी गर्दी केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, महारा कुटुंब हे एक मोठे कुटुंब असून एकूण 100 सदस्य आहेत तसेच या कुटुंबात 130 बोटी आहेत. बोट चालवणे हा या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय आहे. या कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांनी सांगितले तेवढीच कमाई झाली. पण कुटुंब मोठे असून हे पैसे कोणा एका व्यक्तीला मिळाले नाहीत. जे काही पैसे आले ते सर्व वाटले गेले आहेत. ()

हेही वाचा : CM Fadnavis : शेतकऱ्यांची वीज बिलाची चिंता मिटली, मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 

माध्यमांशी बोलताना पिंटू महारा यांनी सांगितले की, आम्ही कल्पनेपेक्षा अधिक कमाई केली. पिंटू महारा यांच्या आई शुक्लवती देवी म्हणाल्या की, महाकुंभाच्या चांगल्या व्यवस्थापनामुळे भाविकांची संख्या वाढली. त्यामुळे फक्त आम्हालाच नव्हे तर सर्व नाविकांना अपेक्षेपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले. तसेच, यावेळी पिंटू महारा म्हणाले की, “आम्ही 2019च्या कुंभमेळ्यातही बोट चालवली होती. त्या कुंभमेळ्यावरूनच आम्हाला अंदाज आला होता की यावर्षीच्या महाकुंभमेळ्याला बरेच भाविक येणार आहेत. महाकुंभाच्या मेळ्याच्या आधी बोटींची संख्या दुप्पट करण्यात आली आणि संपूर्ण कुटुंबासाठी आम्ही 70 नवीन बोटी खरेदी केल्या. त्याच्या शंभराहून अधिक सदस्यांच्या कुटुंबाकडे आधीच 60 बोटी होत्या. अशाप्रकारे आम्ही महाकुंभात या 130 नौका उतरवल्या. इतक्या मोठ्या कालावधीसाठी बोटी बुक करण्याची ही पहिलीच वेळ होती. महारा कुटुंब या कमाईतून त्यांच्या बोटींचा विस्तार करण्याची आणि भविष्यात या व्यवसायाला अधिक संघटित स्वरूप देण्याची योजना आखत आहेत.

संगमला दोन मुख्य घाट आहेत, एक अरैल आणि दुसरा किल्ल्याजवळ बांधलेला व्हीव्हीआय घाट. दोन्ही बाजूंना होड्या आहेत. अराईल क्षेत्राला जास्त उत्पन्न मिळाले कारण तेथे जास्त व्हीआयपी पाहुणे येत होते. या बाजूला पोलिस आणि प्रशासनासह इतर विभागांचे व्हीआयपी घाट बांधले गेले. पिंटू महारा कुटुंबाच्या बोटी या दिशेने धावत होत्या. दुसऱ्या टोकावरील खलाशीदेखील महाकुंभातील कमाईवर समाधानी आहेत. किल्ल्याजवळील व्हीआयपी घाटावर उपस्थित असलेले खलाशी म्हणतात की ते 45 दिवस कधीही विसरणार नाहीत. ज्यांच्याकडे कमी होड्या होत्या त्यांनाही गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला आहे. महाकुंभमेळाव्याच्या काळात अधिकाऱ्यांनी एकूण 14 घाटांवरून बोटी चालवल्या होत्या. यासाठी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांधकाम ब्लॉक 4 ने किला घाट येथील बोट चाचणी कार्यालयात 10 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील एकूण 1400 बोटींचे मोजमाप केले होते. मोजमापानंतर सर्वांना बोटी चालवण्याचा परवाना देण्यात आला.