घरदेश-विदेशPM Modi : यावर्षी मोदी घेतील राजकीय संन्यास....स्वामी गिरी यांची भविष्यवाणी

PM Modi : यावर्षी मोदी घेतील राजकीय संन्यास….स्वामी गिरी यांची भविष्यवाणी

Subscribe

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. महामंडलेश्वरर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी केलेल्या दाव्यानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या आधारे भविष्यवाणी केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वर्षे देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. मात्र 12 वर्षे पद भूषवल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणातून दूर जातील असं महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरींनी म्हटले आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली मोदी स्वत: पद सोडून त्याजागी योग्य व्यक्तीकडे जबाबदारी सोपवतील, असं विधानही स्वामी गिरींनी केले आहे. तसेच मोदींनंतर पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव त्यांनी सूचित केले आहे. उत्तर प्रदेशमधील महोबामध्ये स्वजन शिष्य संम्मेलनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी हे भाकित केलं आहे.

यावेळी महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि म्हणाले की, 12 वर्षे पद भूषवल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रवादाच्या नावाखाली स्वत: पंतप्रधान पद सोडतील, आणि एका सक्षम व्यक्तीकडे पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवतील, यानंतर मोदी राजकारणातून संन्यास घेतील. यातू एक आदर्श सर्वांसमोर ठेवतील ज्यातून ते राजकीय इतिहास घडवतील, असही ते म्हणाले.

- Advertisement -

गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी यांनी मे 2024 मध्ये भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान झाले. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही देशवासियांनी भाजप आणि मित्र पक्षांच्या बाजूने मत देत मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवली. मात्र महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनं गिरि यांच्या म्हणण्यानुसार, 2024 च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान झाल्यानंतर मोदी दोन वर्षांमध्ये म्हणजे 2026 मध्ये राजकारणातून संन्यास घेतील. मात्र आमचा आशिर्वाद आहे की, पंतप्रधान मोदींचा 12 वर्षांचा कार्यकाळ पू्र्ण झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे दिल्लीची गादी म्हणजे पंतप्रधान पद सांभाळतील, असे भाकितही त्यांनी केले. तसेच योगींनी पंतप्रधान पदावर येऊन हिंदू राष्ट्रवादाचं स्वप्न पूर्ण करावे अशी इच्छाही महामंडलेश्वर यांनी व्यक्त केली.

मोदींच्या राजकीय संन्यासावर भाष्य करताना महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी मुनव्वर राना यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अशा मानसिकतेचे लोक भारतावरील ओझं आहेत, भारत आमच्या बापाचा आहे. मुनव्वर रानाच्या बापाबद्दल आम्हाला ठाऊक नाही. ते इथले आहेत की, इतर कुठले याची माहिती नाही. ज्या देशाबद्दल यांच्या मनामध्ये द्वेष आहे तिथं राहण्याचा यांना अधिकार आहे. असे लोक तलावामधील सडलेल्या माशांप्रमाणे असतात, अशा गंभीर शब्दात महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि टीका केली आहे.


भारतातील हिजाब वादात पाकिस्तानची उडी; अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याविषयी व्यक्त केली चिंता

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -