Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 Live Maharashtra Assembly Budget : विधानसभेचे आजचे कामकाज संपले

Live Maharashtra Assembly Budget : विधानसभेचे आजचे कामकाज संपले

Subscribe

विधानसभेचे आजचे कामकाज संपले

विधान परिषदेचे आजचे कामकाज संपले

- Advertisement -

दीड वर्षांपासून धमक्याचे फोन, निनावी पत्र – आशिष शेलार

विनयभंगप्रकरणी माझ्यावर गुन्हा असल्याने माझ्या मुलाला परदेशी शिक्षणासाठी प्रवेशासाठी अडचणी

- Advertisement -

पदावर आक्षेप असतो त्या व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या चारित्र्यावर आक्षेप नसतो – आशिष शेलार

देशातील लोकशाही संपली- आदित्य ठाकरे


विधानसभेत काळे रिबिन बांधून विरोधकांचा निषेध

काळे रिबिन बांधण्यावर तालिका अध्यक्षांचा आक्षेप


चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. सर्व यंत्रणा दबावाखाली आहेत – उद्धव ठाकरे


जे येथून पैसे घेऊन पळून गेले ते बॅकवर्ड समाजाचे होते का? राहुल गांधी जे सत्य देशासमोर ठेवायचा प्रयत्न करत आहेत ते भाजपाला सहन होत नाहीय- मलिल्कार्जुन खर्गे


लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातील निर्णय. गेल्या नऊ वर्षांत नरेंद्र मोदींचं सरकार आपल्या मित्रोंसाठी ललित मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी अशा लोकांनी लाखो हजारो कोटी रुपये घेऊन पळालेत. त्यांना सहकार्य करण्याचं काम मोदी सरकार करत आहे. त्यांविरोधात राहुल गांधी आवाज उठवत आहेत. लोकसभेत त्यांना बोलू दिलं जात नाही. रस्त्यावर बोलले की त्यांनी अडवलं जातं. जिल्हा न्यायाचा एक निर्णय गेऊन राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द करण्याचं पाप ठरवून केलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करू. इंग्रजाप्रमाणे लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून ईडी, सीबीआयची चौकशी लावून त्याला दबावात ठेवलं जात आहे. देशाची तिजोरी लुटली, बँक लुटली अशा भूमिका मांडणाऱ्या राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल. त्यामुळे आम्ही मोदी सरकारचा धिक्कार करतो – नाना पटोले


अघोषित आणीबाणी आणायचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधींना जो देशात प्रतिसाद मिळतो आहे. नरेंद्र मोदींची अप्रियता वाढायला लागली आहे. महागाई, बेरोजगारी रोखण्यास नरेंद्र मोदी अपयशी ठरत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची लोकप्रियता वाढू लागल्याने ही कारवाई झाली आहे. एका बाजूला शिक्षा करून दोन वर्षे तुरुंगात डांबायचं आणि दुसऱ्या बाजुला त्यांची खासदारकी रद्द करायची. राहुल गांधींचा आवाज बंद करण्याचा हा दुष्ट प्रयत्न. सूडभावनेने केलेली कारवाई – पृथ्वीराज चव्हाण


काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराची खासदारकी रद्द केली गेली. वैचारिक मतभेद असू शकतात. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत कुणाची खासदारकी रद्द केल्याचं मलातरी काही आठवत नाही. हे लोकशाहीत बसत नाही. आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. आज ज्याप्रकारचा निर्णय लोकसभेने घेतला आहे. तो निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे. याचा आम्ही धिक्कार करतो – अजित पवार

जनता हे सगळं बघतेय. कोणीही राज्यकर्त्यांनी राज्यकर्ते असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं ही आपल्या देशाची परंपरा आणि पद्धत आहे. परंतु, त्यालाच तिलांजली देण्याचं काम दिलं आहे – अजित पवार

इंदिराजींच्या बाबतीही तेव्हाचं सरकार वागलं होतं. १९७७ साली ज्यांना पराभूत केलं होतं त्याच इंद्राजींना १९८० साली प्रचंड बहुमताने भारताच्या जनतेने लोकशाहीच्या पद्धतीने मतदानाने केलं आहे – अजित पवार


राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भाजपा राहुल गांधींना आणखी घाबरायला लागलं हे सिद्ध करणारं हा निर्णय आहे – बाळासाहेब थोरात

इंदिराजींनीही या व्यवस्थेला तोंड दिलं होतं. राहुलजी सुद्धा या दडपशाहीला घाबरणार नाहीत. राहुल गांधीं देशाचे पंतप्रधान झालेले दिसतील – बाळासाहेब थोरात

भारत जोडोनंतर देशात चित्र बदललं. भाजपाला याची भीती वाटते आहे. त्यांनीच लोकशाहीतून दडपशाही आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू केली आहे – बाळासाहेब थोरात

लोकशाहीसाठी नव्या स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली आहे – बाळासाहेब थोरात


२०१३ ला हा कायदा सर्वोच्च सदनाने पास केला आहे. कोणत्याही आमदार-खासदाराला दोन किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याचे सदस्यत्व रद्द होण्याचा कायदा काँग्रेसच्याच काळात आला. याच कायद्याखाली राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द झालं. त्यांनी केलेला कायदा पाळल्यामुळे सभात्याग करणे हा काँग्रेसचा ढोंगीपणा आहे – अतुल भातखळकर


लोकशाहीचा खून करणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो, विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन


राहुल गांधींप्रकरणी विधानसभेत विरोधकांचा सभात्याग


आंतरराष्ट्रीय बुकीची मुलगी थेट तुमच्या घरात कशी येते?- अजित पवार

माझ्या डोळा मारल्याची राज ठाकरेंनीही दखल घेतली

व्हिडीओ कॉल  आल्यार चेहरा लपवा, अन्यथा स्क्रीन शॉट काढतात – पवार


कांदिवलीतील ४ सोसायटी सेल्फ रिडेव्हलमेंटसाठी मुंबई बँकेने निधी दिला

मात्र म्हाडाकडून NOC साठी तेथील अधिकारी दीड कोटी रुपये मागत असल्याची बाब निदर्शनास आली

हे गंभीर असून उपमुख्यमंत्र्यानी फोन केल्यानंतर त्या NOC मिळालेल्या आहेत

संबधित अधिकाऱ्यांची चौकशीच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे


विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आचारसंहिता पाळणे गरजेचे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांना चोर, मिंधे, खोके असं बोलणं योग्य आहे का?


सभागृह आवारासाठी एसओपी तयार करणार

लोकशाही खतरेमध्ये असेल तर भारतात भारत जोडो यात्रा कशी काढली – एकनाथ शिंदे

ज्या जी२०चं अध्यक्षपद मिळालं त्याच कार्यक्रमात तुमचे नेते म्हणतात की भारतात लोकशाही धोक्यात आहे म्हणून – शिंदे

आम्ही इंदिरा गांधींचा मान राखतो, तुम्ही आमच्या पंतप्रधांनाना बोलत असाल तर आम्ही सहन करणार नाही

मुख्यमंत्री बोलत असताना विरोधकांची घोषणाबाजी

देशभक्ती, राष्ट्रभक्ती ज्यांच्या नसानसांत भिनली आहे त्यांना देशद्रोही म्हणता – एकनाथ शिंदे

आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला आहे, कारवाई व्हायची असेल तर सर्वांवर सारखी झाली पाहिजे


सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक, विधानसभेत गोंधळ


विधानभवन पायऱ्यांवर राहुल गांधींविरोधात जोडो मारो आंदोलन केल्यामुळे विरोधक आक्रमक

राहुल गांधींनी भारताची प्रतिमा मलीन आणि सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी सत्ताधारी संतापले


विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

50 खोके एकदम ओकेच्या घोषणा

गुजरात निरमा योजनेचेही पोस्टर


 

- Advertisment -