घरक्राइमपुण्यात एटीएसची मोठी कारवाई; लष्कर-ए-तोय्यबाच्या आणखी एका दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या

पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; लष्कर-ए-तोय्यबाच्या आणखी एका दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या

Subscribe

दरम्यान आरोपी जुनैदला अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 3 जूनपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते.

महाराष्ट्र एटीएस तपास पथकाकडून राज्यात घातपात घडवण्याच्या उद्देशाने आलेल्या दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. अशात काश्मीरमध्ये एटीएसने एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुनैद (Pune Youth Arrested) या दहशतवाद्याच्या संपर्कातील एका दहशतवाद्यला एटीएसने बेड्या ठोकल्या आहेत. काश्मीरमधून या दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून तोही जुनैदप्रमाणे लषकर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra ATS)

अलीकडेच महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून मोहम्मद जुनैद या दहशतवाद्याला अटक केली होती. पुण्यातील दापोडी परिसरातून त्याला अटक करण्यात आली होती, लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेसाठी तो काम करत होता. याच प्रकरणात आता एटीएसने काश्मीरमधून एकाला बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील जुनैद हा दहशतवादी या दहशतवाद्याच्या सातत्याने संपर्कात होता. (Jammu And Kashmir Terror Activities)

- Advertisement -

दरम्यान आरोपी जुनैदला अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 3 जूनपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. यातून भारतात त्यांचा मोठा घातपात घडवण्याचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान या दहशतवाद्यांची माहिती दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला दिली यानंतर जुनैद एटीएसच्या रडारवर होता. अखेर दोघांनी अटक करण्यात आली असून त्यांच्या संपर्कातील इतर लोकांचाही पोलिसांकडून शोध आहे. दरम्यान या दोघांच्या अटकेनंतरच्या चौकशीतून घातपाती कारवायांसंदर्भात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. (Terrorist Arrest From Kashmir)

जुनैदवर नेमके आरोप काय?

मोहम्मद जुनैद हा गेल्या दोन वर्षांत 6 वेळा काश्मीरमध्ये जाऊन आला, दरम्यान फेसबुकच्या माध्यमातून तो दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. सतत सिमकार्ड बदलत तो फेसबुक आणि व्हॉटसअॅपवर सक्रिय होता. त्याच्यावर तीन लोकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याची जबाबदारी होती, यासाठी तो आणखी तीन जणांच्या संपर्कात होता. शस्त्रास्त्र खरेदीसाठी तो टेरर फडिंग करत होता, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची त्यांने रेकी केली होती. दरम्यान महाराष्ट्रात घातपात घडवण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून त्याच्या अकाऊंटमध्ये पाच ते दहा हजार रुपये पाठवण्यात आले, हे पैसे त्याने वेगवेगळ्य़ा कामांसाठी वापरले.

- Advertisement -

दरम्यान दहशतवादी विरोधी पथकाने जुनैदच्या प्रत्येक हालचालींवर तसेच त्याच्या फेसबुक आणि WhatsApp chat वर लक्ष केंद्रीत केले. यावेळी तो सातत्याने सिमकार्ड बदलून संपर्क करत असल्याचे दिसून आले. दहशतवादी संघटनेने त्याला टेरर फंडिंग जमा करण्यापासून ते तरुणांना रॅडिकलाईज करुन भरती करण्याची जबाबदारी सोपवली होती. यात तीन तरुणांच्या भरती तयारी देखील त्याने पूर्ण केली होती. त्यामुळे राज्यातील बुलढाण्यातील बेकार तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होत असल्याचे प्रकार देशाच्या सुरक्षेसाठी नक्कीच धोकादायक आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा आणि तपास यंत्रणा दोन्ही समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.


Sidhu Moosewala Death प्रकरणी आत्तापर्यंत तीन गुंडांना अटक, नेमके आरोप काय?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -