घरक्राइमऔरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाचा तरुणीवर हल्ला

औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाचा तरुणीवर हल्ला

Subscribe

औरंगाबाद विद्यापीठात एका तरुणाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतत एका तरुणीला मिठीत घेऊन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असताना आता एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका १७ वर्षीय मुलीची छेड काढत तिच्यावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.

औरंगाबाद विद्यापीठात एका तरुणाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतत एका तरुणीला मिठीत घेऊन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असताना आता एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका १७ वर्षीय मुलीची छेड काढत तिच्यावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाहीस, मी मरेन आणि तुलाही मारीन, अशी धमकी देत या इसामाने पीडितेवर हल्ला केला. (maharashtra aurangabad a young man molested a young woman out of one sided love)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवा साळुंके असे या तरुणाचे नाव आहे. शिवा हा औरंगाबादमधील वाळूज येथील गट क्रमांक ७ वडगाव कोल्हाटी येथे राहणारा रहिवाशी आहे. आरोपी शिवाने २४ तारखेला ही अल्पवयीन तरुणी रात्री ९ वाजताच्या सुमारास तिच्या घराजवळ असतांना तिला धमकावले. माझ्या सोबत रिलेशनशिपमध्ये मध्ये राहा असे, अशा शब्दांत धमकावले.

- Advertisement -

यावेळी मुलीने त्याला फटकारत नकार दिला. तिच्या हा नकार सहन न झाल्याने आरोपी शिवाने पीडित मुलीचा हात पकडला. यावेळी त्याने तू माझी नाहीस तर कोणाची नाही असे म्हणत तिचा विनयभंग केला. मुलीने प्रतिकार केल्याने आरोपी तेथून पळून गेला. घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीने पुन्हा मुलीचा पाठलाग केला आणि तिची छेड काढली. आज मी मरणार असून, तुलाही मारणार असल्याची धमकी त्याने दिली. आरोपी शिवाच्या धमकीनंतर मुलीने आई वाडिलांसोबत वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

दरम्यान, औरंगाबाद येथील वाळूज महानगरात कुटुंबासह राहणारी एक अल्पवयीन मुलगी ही एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे.


हेही वाचा – उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं.., नक्कल करत राज ठाकरेंची राज्यपालांवर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -