घरताज्या घडामोडीभाजप - मनसे युतीचा निर्णय अमित भाईंचा - चंद्रकांत पाटील

भाजप – मनसे युतीचा निर्णय अमित भाईंचा – चंद्रकांत पाटील

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आढावा घेत असतात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणीत अपडेट्स त्यांच्याकडे येणार नाही अशी गोष्ट घडत नाही. अमित शहा हे प्रत्येक राजकीय घडामोडीच्या बाबतीत नेहमीच अपडेट असतात. म्हणूनच माझी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली, ही भेट खूपच एक्सिडेंटल होती ही माहिती मी त्यांची जर वेळ मिळाली तर नक्कीच सांगणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिली. भाजप आणि मनसे युतीचा निर्णय हा अमित भाईंचा असेल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावर या युतीचे नेमके काय परिणाम असतील हेदेखील महत्वाचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. संसदेचे अधिवेशनात अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेड्युल्ड आता व्यस्त आहे. सध्या संसदेच्या कामकाजामुळे ते भेटीसाठी किती वेळ देऊ शकतील याबाबत शंका आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

नारायण राणेंसोबत चहा- गडकरींकडे जेवण

महाराष्ट्रातील खासदारांना आणि मंत्र्यांना भेटण्याचा आमचा दरवर्षी ठरलेला कार्यक्रम असतो. पहिल्यांदाच महाराष्ट्रातील खासदारांची संख्या आठ झाली आहे. त्यामध्ये दोन जणांचे मंत्रीपद जाऊन चार जणांना महाराष्ट्रातून मंत्रीपद मिळाले आहे. या नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे अशी आमची महाराष्ट्रात चर्चा झाली. त्यांच्याकडे असणारे खाते समजून घेतले पाहिजे. त्या कामाचा महाराष्ट्राला कसा उपयोग यायला हवा यासाठी आम्ही भेटी घेण्याचा दरवर्षीचा असा कार्यक्रम असतो. त्यानिमित्ताने आम्ही दिल्लीला येतो आणि खासदारांना जेवणे देतो. महाराष्ट्राचे विषय लावून धरावेत, तसेच सर्वसाधारण मागण्या या भेटीच्या निमित्ताने असतात. आम्ही तीन दिवस दिल्लीत आहोत. यानिमित्ताने आम्ही आज शनिवारी दुपारी भागवत कराड यांना भेटणार आहोत. तर नाश्त्यासाठी नारायणे राणेंकडे जाणार आहे. शनिवार – रविवार असल्याने खासदारांच्या गाठी भेटी होतील. येत्या सोमवारी नितीन गडकरी नागपूरातून दिल्लीला येणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील खासदारांचीही भेट सोमवारी होऊ शकते. त्यामुळे सोमवारपर्यंत मुक्काम करून आम्ही मंगळवारी दिल्लीतून निघणार आहोत असेही ते म्हणाले.

- Advertisement -

अमित शहांसोबत बैठका नेहमीच्या 

महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांपैकी आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अमित शहा यांची भेट घेतली. पण महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार हे महाराष्ट्रातील विषय घेऊन नेहमीच अमित शहा यांना भेटत असतात. अनेकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील इनपुट्स आमच्याकडून घेऊनच भेटीला जात असतात. कारण अमित शहा हे महाराष्ट्रात सध्या काय सुरू आहे, याबाबतची माहिती विचारत असतात. त्यामुळेच महाराष्ट्रातील घडामोडींच्या बाबतीत आम्ही त्यासाठीचे इनपुट्स देत असतो.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -