घरताज्या घडामोडीLive Update: अनिल देशमुख यांच्या जावयाला सीबीआयनं घेतलं ताब्यात, देशमुख कुटुंबियांचा आरोप

Live Update: अनिल देशमुख यांच्या जावयाला सीबीआयनं घेतलं ताब्यात, देशमुख कुटुंबियांचा आरोप

Subscribe

Live Update: गौरव चतुर्वेदींची सीबीआयकडून २० मिनिटे चौकशी

अनिल देशमुख यांच्या जावयाला सीबीआयनं घेतलं ताब्यात, देशमुख कुटुंबियांचा आरोप

- Advertisement -

वरळीतील सुखदामधून सीबीआयनं चतुर्वेदींना घेतलं ताब्यात, चौकशी सुरु

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जावई गौरव चतुर्वेदी याला सीबीआयने ताब्यात घेतलं असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. गौरव चतुर्वेदी याचे १० जणांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

१०० कोटी वसुली प्रकरणातील अनिल देशमुखांच्या प्राथमिक चौकशीचा रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी लाच देण्यात आली – सीबीआयच्या सूत्रांची माहिती

सीबीआयच्या एका अधिकाऱ्याला लाच देण्यात आली होती त्याअनुषंगाने चौकशी सुरू…

देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांचा रोल स्पष्ट झाला नाही म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं मात्र वकील आनंद डागा यांची चौकशी अद्याप सुरुय..

15 दिवसांच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल बनवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टीममधील एका अधिकाऱ्याला लाच देण्यात आली होती – सीबीआयच्या सूत्रांची माहिती…


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटले, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्याबाबत चर्चा


 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनाच्या दिशेनं रवाना

उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल, थोड्याच वेळात होणार राज्यपालांची भेट


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राज्यपालांना भेटणार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाविकास आघाडी सरकारचे शिष्ट मंडळ घेणार भेट, राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा तिढा सुटण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घेणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट


दिग्दर्शक फराह खान कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही झाली कोरोनाची लागण


पर्यावरणासाठी आराखडा तयार करणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळात आयपीसीसीच्या वातावरणीय बदलाबाबतच्या अहवालावर चर्चा करण्यात आली आहे. या अहवालावर राज्य सरकार सकारात्मक असून पर्यावरण बदलाबाबत ॲक्शन प्लान तयार करण्याचे ठरवण्यात आले असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ( सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा )


मंदिरं खुली करण्यासाठी चंद्रकांत पाटील आक्रमक

मदिरं उघडली नाही तर बळजबरीने उघडू, चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा


जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांच्या प्रकृतीत बिघाड, हिंदुजा रूग्णालयातील ICU मध्ये दाखल


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उद्यापासून मराठवाडा मध्ये सुरु होणारा राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा रद्द झाला असून आता ते मराठवाडामधील पूरपरिस्थितीमुळे दौरा रद्द करणार


छगन भुजबळ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही आमची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ त्यांची हकालपट्टी करावी, किरीट सोमैय्या यांचं सूचक वक्तव्य


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांनी आज ठाण्यात ज्युपिटर रुग्णालयात जाऊन फेरीवाल्याच्या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या पालिका महिला अधिकारी कल्पना पिंपळे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत व जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव आदी उपस्थित होते.


जखमी अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या भेटीला राज ठाकरे ठाण्यातील ज्यूपीटर रूग्णालयात दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात दाखल झाले आहेत. राज ठाकरे हे ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार


अभिनेत्री पायल रोहतगीच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


देशात नव्या कोरोनाबाधितांमध्ये वाढ; दिवसभरात ४१, ९६५ नवे रूग्ण

गेल्या २४ तासात भारतात ४१ हजार ९६५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४६० रुग्णांना प्राण गमवावे लागले.


चाळीसगाव तालुक्यातील सातशेहून अधिक गावांमध्ये पाणी शिरले होते. चाळीसगावात मुसळधार पावसामुळं पूरस्थिथी निर्माण झाली होती. मात्र आज पावसाने सकाळी काहीशी विश्रांती घेतली असून पावसाचं पाणी ओसरल्याचे सांगितले जात आहे. मात्र पुरजन्य परिस्थितीमुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.


आज १ सप्टेंबर रोजी गॅस सिलेंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. १५ दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर ५० रुपयांनी महागला


देशात एकाच दिवशी १.३० कोटी डोस; आतापर्यंत ६५ कोटीचा टप्पा पार

देशात गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचा विक्रम करण्यात आला आहे. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल १.३० कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला.


शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून यानुसार आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. १५ टक्के प्रवेश शुल्क सवलतीबाबत शिक्षण विभागाकडूनच निर्णय जाहीर झाला आहे. या निर्णयानुसार अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्कात विद्यार्थ्यांना ही सूट मिळणार आहे.


गोरेगाव परिसरातल्या इमारतींमध्ये बिबट्याची एन्ट्री

गोरेगाव परिसरात असणारे कुत्रे, मांजराची शिकार करण्यासाठी बिबट्या इमारती परिसरात शिरला.


पुरग्रस्तांच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांची आजपासून पदयात्रा

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली या ठिकाणाहून ही पदयात्रा सुरू होणार असून पाच सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी या ठिकाणी पदयात्रा पोहोचणार आहे. यावेळी पूरग्रस्त नागरिकांना सरकारने दिलासा दिला नाही तर सामूहिक जलसमाधी घेतली जाईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.


गणेशोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरीत आजपासून एसटी पूर्ण क्षमतेनं धावणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमधील शिथिलता असली तरी असताना एसटी धावत नव्हती. मात्र गणेशोत्सवाच्या तोंडावर आता रत्नागिरी जिल्हावासियांना एक खुशखबर मिळाली आहे. कारण, आजपासून एसटी सेवा पूर्ण क्षमतेनं धावणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर जिल्ह्यात एसटी पूर्ण क्षमतेनं धावणार


भाजप नेते किरीट सोमैय्या आज नाशिक दौऱ्यावर राहणार असून छगन भुजबळ यांच्या काही मालमत्ता असलेल्या ठिकाणांना देणार भेट

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -