घर देश-विदेश 'मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही', काँग्रेसच्या 'या' एकमेव खासदारात होती पंतप्रधानांना भिडण्याची...

‘मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’, काँग्रेसच्या ‘या’ एकमेव खासदारात होती पंतप्रधानांना भिडण्याची धमक

Subscribe

स्वतःवर असलेला प्रचंड आत्मविश्वास आणि निडर वृत्ती यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आव्हान दिले. "पक्षाने आदेश दिला तर मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहाणार नाही", त्यांच्या या वाक्याने नॅशनल मीडियाचे लक्ष बाळू धानोरकरांकडे लागले होते.

Suresh Dhanorkar Passed away काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar Passed away) यांचे मंगळवारी सकाळी अकाली निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना नागपूरहून एअर अॅम्ब्यूलन्सने दिल्लीला हलवण्यात आले होते. सोमवारी ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याच्या बातम्या आल्या आणि मंगळवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली. धानोरकरांच्या अकाली एक्झिटने काँग्रेसने राज्यातील एकमेव खासदारही गमावला आहे.

2019 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचं पानीपत झालं. याही परिस्थितीत चंद्रपूर लोकसभेची एकमेव जागा काँग्रेसला मिळाली, ती तरुण तडफदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या रुपाने. महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार हीच बाळू धानोरकर यांची नंतर ओळख बनली. दांडगा जनसंपर्क आणि बेधडक काम करण्याच्या स्टाईलमुळे बाळू धानोरकर हे चंद्रपूरमध्ये लोकप्रिय होते. होणारं काम असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत करणार आणि होणार नसेल तर तसंही समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगणार ही बाळू धानोरकरांची खासियत.

- Advertisement -

त्यांचा राजकीय प्रवास देखील अनेक चढउतारांचा राहिला आहे. शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून सुरु झालेली कारकिर्द चंद्रपूरच्या खासदारपदापर्यंत पोहचली, हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. शिवसेनेत धानोरकरांची जडणघडण झाली. शिवसेना स्टाईलनेच झाली. त्यामुळे त्यांना तडीपार देखील राहावे लागले.

हेही वाचा : बाळु धानोरकर, राजीव सातवांची पन्नाशीत; वयाच्या साठीपूर्वीच राज्यातील सहा लोकप्रतिनिधींची एक्झिट

- Advertisement -

२०१४ मध्ये बाळू धानोरकरांची पहिल्यांदा विधानसभेत एन्ट्री झाली. संजय देवताळे या मंत्रिपदाचा अनुभव असलेल्या भाजप नेत्याला पराभतू करुन वरोरा विधानसभा मतदारसंघातून बाळू धानोरकरांनी विधानसभेत प्रवेश केला. धानोरकरांना ५३,८७७ तर संजय देवताळे यांना ५१,८७३ मते मिळाली होती.

केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा लोकसभेत केला पराभव

विधानसभेत भाजपच्या मंत्र्याला पराभूत केल्यानंतर धानोरकरांनी लोकसभेत केंद्रीय मंत्र्याला पराभूत करण्याची देखील किमया करुन दाखवली. २०१४ नंतर उद्धव ठाकरे यांनी बाळू धानोरकरांना लोकसभेची तयारी करण्यास सांगितले होते. मात्र २०१९मध्ये शिवसेना – भाजप युती होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर चंद्रपूर हा मतदारसंघ भाजपला सोडला जाणार होता. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर बाळू धानोरकरांनी केलेली लोकसभेची तयारी वाया जाणार होती. असे होऊ नये यासाठी बाळू धानोरकरांनी अजित पवारांशी संपर्कसाधला आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते, याची माहिती स्वतः अजित पवारांनी दिली.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा मात्र धानोरकरांच्या विजयावर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना सोबत घेऊन राहुल गांधींची भेट घेतली आणि बाळू धानोरकर हे विनिंग कँडिडेट आहेत, हे पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात यशस्वी राहिले. शरद पवारांनीही धानोरकरांच्या उमेदवारीसाठी राहुल गांधींना फोन केल्याची तेव्हा चर्चा होती. अखेर काँग्रेसने २०१९ लोकसभेत बाळू धानोरकरांना उमेदवारी दिली. राज्यात काँग्रेसचे दिग्गज नेते मोदी लाटेत वाहून गेले असताना चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत नवख्या बाळू धानोरकरांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना पराभवाची धूळ चारली. बाळू धानोरकरांना या निवडणुकीत ५ लाख ५९,५०७ तर अहीर यांना ५ लाख १४,७४४ मते मिळाली. काँग्रेसचे जायंट किलर म्हणून ते पुढे आले. वयाच्या ४३-४४ व्या वर्षी बाळू धानोरकर स्वतःच्या मेहनतीवर लोकसभेत पोहचले.

“मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहाणार नाही”

स्वतःवर असलेला प्रचंड आत्मविश्वास आणि निडर वृत्ती यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (PM Narendra Modi) आव्हान दिले. “पक्षाने आदेश दिला तर मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहाणार नाही”, त्यांच्या या वाक्याने नॅशनल मीडियाचे लक्ष बाळू धानोरकरांकडे लागले होते. ते म्हणाले होते, पक्षाने (काँग्रेस) आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा लढवायलाही तयार आहे. भाजप ही आमची पैदाईश आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेनं हद्दपार केलं, त्याप्रमाणे मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय मी राहाणार नाही. सार्वत्रिक निवडणुकीला अजून तीन वर्षांचा अवकाश आहे. पक्षाने फक्त आदेश द्यावा, मी वाराणसीत जाऊन लढू शकतो. मी जर गेलो नाही आणि मोदींचा ट्रम्प केला नाही तर नाव बाळू धानोरकर लावणार नाही, असे म्हणत बाळू धानोरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात दोन हात करण्याची तयारी दाखवली होती.

हेही वाचा : Balu Dhanorkar passes away : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

महाराष्ट्रातून काँग्रेसचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करणारे बाळू धानोरकर हे एकमेव खासदार होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे पत्नी प्रतिभा धानोरकर आणि दोन मुले आहेत. त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर या वरोरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार आहेत.

VIDEO : Balu Dhanorkar : मोदी लाटेतही ठरले जायंट किलर, शिवसेना व्हाया काँगेस धानोरकरांचा प्रवास

- Advertisment -