Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE देशातील सर्वाधिक Active केसेसमधील १० जिल्ह्यांपैकी ८ जिल्हे महाराष्ट्रातले!

देशातील सर्वाधिक Active केसेसमधील १० जिल्ह्यांपैकी ८ जिल्हे महाराष्ट्रातले!

महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक!

Related Story

- Advertisement -

फक्त महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ५० हजारांहून अधिक रुग्ण दिवसाला आढळत आहे. त्यामुळे गेल्यावर्षीची परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची अधिक शक्यता आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून ३० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहेत. त्यामुळे सध्या राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. आता महाराष्ट्रासंदर्भात चिंतेचीबाबत समोर आली आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील सर्वाधिक Active केसेसमधील १० जिल्ह्यापैकी ८ जिल्हे महाराष्ट्रातले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वाधिक Active केसेसमधील १० जिल्ह्यापैकी ७ जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. या जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगळूरू ग्रामीण, नांदेड, दिल्ली आणि अहमदनगर यांचा समावेश आहे.

- Advertisement -

पुढे राजेश भूषण यांनी सांगितले की, देशातला आठवडी सरासरी पॉझिटिव्ह रेट ५.६५ टक्के आहे. महाराष्ट्राचा पॉझिटिव्ह रेट २३ टक्के, पंजाबचा ८.८२ टक्के, छत्तीगढचा ८ टक्के, मध्यप्रदेशचा ७.८२ टक्के, तामिळनाडूचा २.५० टक्के, कर्नाटकचा २.४५ टक्के, गुजरातचा २.२ टक्के आणि दिल्लीचा २.४ टक्के आठवडी सरकारी पॉझिटिव्ह रेट आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५६ हजार २११ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३७ हजार २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २० लाख ९५ हजार ८५५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६२ हजार ११४ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी १३ लाख ९३ हजार २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५ लाख ४९ हजार ७२० रुग्णावर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – घरोघरी कोरोना लसीकरण: केंद्राच्या परवानगीसाठी BMC राज्य सरकारच्या दरबारी


 

- Advertisement -