घरअर्थजगतदेशाच्या तिजोरीत महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान, पहिल्या पाच राज्यांत आणखी कोण?

देशाच्या तिजोरीत महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान, पहिल्या पाच राज्यांत आणखी कोण?

Subscribe

२०१९ च्या उत्तरार्धात कोरोनाचं संकट निर्माण झालं होतं. हे संकट पुढे २०२१ पर्यंत कायम राहिलं. या काळात उद्योगधंदे बंद पडले. लोकांचा रोजगार बुडाला. व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे कर संकलनातही घट झाली होती.

नवी दिल्ली – महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षांत आयकराच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत सर्वाधिक कर भरला आहे. सर्वाधिक कर भरणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागला असून त्यापाठोपाठ दिल्ली आणि कर्नाटक आहे. महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षांत तब्बल १२ लाख कोटींचा कर भरला आहे. त्यामुळे सरकारी खजिन्यात महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – नोटाबंदीचा फज्जा? सहा वर्षांत व्यवहारातील चलनी नोटा वाढल्या, अर्थमंत्र्यांनी आकडेवारीच केली सादर

- Advertisement -

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र, गेल्या काही दिवासंपासून महाराष्ट्रातील लहान मोठ्या शहरांत अनेक उद्योन्मुख कंपन्याला उदयाला येत आहेत. स्टार्टअप्समध्येही महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसंच, क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीतही महाराष्ट्र पहिल्या दोन क्रमांकात आहे. त्यामुळे राज्यातून सर्वाधिक कर भरला जातो. यामुळे गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राने देशाच्या सरकारी खजिन्यात तब्बल १२ कोटींचा कर भरला आहे. यापैकी ३ लाख ८४ हजार २५८ कोटी रुपये २०१९-२० या काळात भरले. तर, ३ लाख ३१ हजार ९६९ कोटी २०२०-२१ मध्ये भरले आहेत. तसंच, २०२१-२२ या वर्षांत महाराष्ट्राने देशाच्या तिजोरीत ५ लाख २४ हजार ४९८ कोटी रुपये भरले आहेत.

२०१९ च्या उत्तरार्धात कोरोनाचं संकट निर्माण झालं होतं. हे संकट पुढे २०२१ पर्यंत कायम राहिलं. या काळात उद्योगधंदे बंद पडले. लोकांचा रोजगार बुडाला. व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे कर संकलनातही घट झाली होती. त्यामुळे २०१९-२१ पर्यंत कर संकलन घटले होते. मात्र, कोरोनाचे सावट दूर होताच बाजारात चैतन्य परतले आणि पुन्हा एकदा व्यवहार सुरळीत झाले. त्यामुळे दोन वर्षांच्या तुलनेत २०२१-२२ या आर्थिक वर्षांत कर संकलनात वाढ झालेली दिसत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Budget 2023 मध्ये नोकरदारांना मिळणार तीन खास गिफ्ट

कोण कितव्या क्रमाकांवर

  • पहिला – भारत
    कर भरणा – ५ लाख २४ हजार ४९८ कोटी
  • दुसरा – नवी दिल्ली
    कर भरणा – ४ लाख ४७ हजार कोटी रुपये
  • तिसरा – कर्नाटक
    कर भरणा – ३ लाख ९३ हजार ९०६ कोटी रुपये
  • चौथा – तामिळनाडू
    कर भरणा – २ लाख १९ हजार ३७० कोटी
  • पाचवा – गुजरात
    कर भरणा – १ लाख ६८ हजार ०२४ कोटी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -