Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत पुढील ३ ते ४ तास मुसळधार पावसाची शक्यता

Live Update: मुंबईत पुढील ३ ते ४ तास मुसळधार पावसाची शक्यता

Related Story

- Advertisement -

मुंबईत पुढील ३ ते ४ तास मुसळधार पावसाची शक्यता

सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट – सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

- Advertisement -


Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या २४ तासात ३५३ कोरोनाबाधितांची नोंद, तर २ रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

२४ तासात बाधित रुग्ण -३५३ २४ तासात बरे झालेले रुग्ण -४०४ बरे झालेले एकूण रुग्ण -७२४८९८ बरे झालेल्या रुग्णांचा दर -९७% एकूण सक्रिय रुग्ण-३७१८ दुप्पटीचा दर -१२६६ दिवस कोविड वाढीचा दर (३१ ऑगस्त ते ६ सप्टेंबर)-०.०६%


मुख्यमंत्री चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला कशाला हवेत, नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे शिवसेना-राणे वाद उफाळणार (सविस्तर वाचा )


चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार, केंद्रिय मंत्री नारायण राणेंची घोषणा

केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीमध्ये चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मी स्वतः उपस्थित असणार असून लवकरच हे विमानतळ सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.


विनायक मेटे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मराठा समाजाबाबतची बैठक संपली,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत विनायक मेटे यांनी २ तास चर्चा केली. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.


छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना पोलिसांनी केलं अटक

न्यायालयाकडून १५ दिवस पोलीस कोठडीचा निर्णय


रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणाला शरद पवारांकडून विरोध

नागरी सहकारी बँका बंद करण्याचं रिझर्व्ह बँकेचं नवं सूत्र – शरद पवार


सरकारला अडचणीच आणण्यासाठी भाजपकडून बदनामीचं कटकारस्थान, अशी नवाब मलिक यांनी टीका केली आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांची विरोधी पक्षनेत्यांबरोबर बैठक झाली होती, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांचा आरोप


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३१ हजार २२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलेली आहे. तर २९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ हजार ९४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढून ३ कोटी २२ लाख २४ हजार ९३७ वर पोहोचली आहे.


गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या १८०० चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ कोकणाकडे रवाना झाली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा आमदार नितेश राणे यांचा या ट्रेनला हिरवा झेंडा


नागपाडासह विविध ठिकाणी केलेल्या छाप्यांदरम्यान ५ ड्रग्स पेडलर्सना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ड्रग्स जप्त केले.


शिवाजी महाराजांना आग्र्यात औरंगजेबाने कैद केले तेव्हा महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती, तरी महाराष्ट्रातील काही लोकांनी आनंद व्यक्त केला होता तसा महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव महानगर पालिकेत पराभव झाला. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना दुःख आहे. एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून भाजपने पेढे वाटले हे १०५ हुतात्म्यांच दुर्दैव – शिवसेना खासदार संजय राऊत


अंधेरी परिसरात एका व्यक्तीला त्याच्या कारने मारल्याच्या आरोपाखाली अभिनेता रजत बेदीविरुद्ध डीएन नगरमध्ये गुन्हा दाखल


चिपळूणसह परिसरात गेल्या १६ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तर दापोलीमध्ये रात्रभर मुसळधार पावसाचं थैमान घातल आहे. दापोली बाजारपेठ, केळस्कर नाका, तहसील कार्यालय याठिकाणी रात्री पाणी भरले होते. वाशिष्ठी नदी पात्राची पातळी सध्या धोक्याची नाही. मात्र असाच पाऊस पडत राहिला तर नदीपात्रामध्ये वाढ होऊ शकते.


मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागांत पुढील तीन-चार तासांत मुसळधार पाऊस पडेल, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


औरंगाबाद वाळूज भागात कंपनीमध्ये तोडफोड करण्यात आली असून कंपनीसमोर भांडण करू नका असे सुरक्षा रक्षकाने सांगितल्याने सहा जणांनी कंपनीच्या केबिनच्या काचा फोडल्या. यासह पार्किंग मधील दुचाकी खाली पडल्यात. बाळूज येथील आकार टूल्स कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना रात्री घडली.

- Advertisement -