घरताज्या घडामोडीLive Update: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा टीमसोबत दिसणार

Live Update: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा टीमसोबत दिसणार

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा टीमसोबत दिसणार आहे. धोनीला मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.


विराट कोहली कर्णधार, रोहित शर्मा उपकर्णधार
आर आश्विनला टीम इंडियात स्थान
शिखर धवनला संघात स्थान नाही.
रविंद्र जडेजा, राहुल चहर, इशान किशनला संधी

- Advertisement -


मुंबईत गेल्या २४ तासात ५३० कोरोनाबाधितांची नोंद, ४ रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

२४ तासात बाधित रुग्ण – ५३०

२४ तासात बरे झालेले रुग्ण -३४९

बरे झालेले एकूण रुग्ण-७२५२४७
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%

एकूण सक्रिय रुग्ण-३८९५

दुप्पटीचा दर-१२५३ दिवस
कोविड वाढीचा दर (१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर)-०.०६%


बीड पोलीस करुणा शर्मांच्या मुंबईतील घराबाहेर दाखल


माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांची तब्येत बिघडली. मिळालेल्या माहितीनुसार, डेंग्यू आणि चिकणगुणियामुळे त्यांची तब्येत बिघडली. वायुदलाच्या विशेष विमानाने धुळे येथून मुंबईत हलविण्यात आले आहे.


मुंबई महापालिका आता केंब्रिज बोर्डाच्या शाळा सुरू करणार

मुंबई महापालिका शाळांबाबत आदित्य ठाकरेंची घोषणा

प्रत्येक वार्डात एक शाळा असणार

महापालिका शाळेत दर्जेदार शिक्षण देणार


९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार, खासदार विनायक राऊतांची माहिती.


औरंगाबाद जिल्ह्यातील रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे हर्सूल तलाव ओव्हरफलो


बीडमधील केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश. दोन लहान मुलींचा मृत्यू, आई गंभीर असून आईवर अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरू


देशात गेल्या २४ तासांत ३७,८७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ८७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलेली आहे. तर ३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३९ हजार ११४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढून ३ कोटी २२ लाख ६४ हजार ५१ वर पोहोचली आहे.


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची आई अरुणा भाटिया यांचे आज, बुधवारी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे.


मुंबईतील शहर आणि उपनगर या दोन्ही ठिकाणी पावसाने २ हजार मिमीचा आकडा पार केला तर सांताक्रूझनंतर आता कुलाबा पावसाच्या नोंदींनीही काल २ हजार मिमीचा टप्पा ओलांडला.


गुगलने आपले आजचे डूडल हे स्वीडिश सुपरस्टार डीजे, गीतकार, कलाकार आणि मानवतावादी कार्यात अग्रेसर असलेल्या टिम बर्गलिंग यांना केलं समर्पित


सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्पातून २९ घ. मी. प्रतिसेकंद इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कणकवलीतील घोणसरी, लोरे नं. १, लोरे नं. २, गडमट, पियाळी, वाघेरी या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.


नागपूर विद्यापीठ नॅकच्या परिक्षेत अव्वल

नॅक कडून नागपूर विद्यापीठाला मिळाला ‘अ’ दर्जा मिळाला असून सलग दुसऱ्यांदा नागपुर विद्यापीठाला मिळाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. वाढत्या रिक्त जागा, कोरोनाच्या समस्यांवर मात करत विद्यापीठाने मिळवला ‘अ’ दर्जा मिळवल्याने कौतुक होत आहे. नॅक समितीने २ ते ४ सप्टेंबर विद्यापीठाची पाहणी केली होती


लातूर जिल्ह्यातील मांजरा, रेणा तेरणा, तिरु यासह अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या. जिल्ह्यातून १४५ किलोमीटर अंतर पार करणारी मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली.अहमदपूर तालुक्यातील चिखली शिवारातील दोन पाझर तलाव फुटले. गावात शिरले पाणी अनेक जनावरे वाहून गेली. तिरु नदीची पाणी पातळी वाढली जळकोट तालुक्यातील काही गावाचा संपर्क तुटला.


इंडोनेशियाच्या बॅन्टेन प्रांतातील तुरुंगात लागलेल्या आगीत ४० जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रिका अपारिंती यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून ही आग कशाने लागले त्याचा शोध घेतला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -