घरताज्या घडामोडीJan Ashirwad Yatra Live Update: जनआशीर्वाद यात्रेतून भाजपचं मुंबईत शक्तीप्रदर्शन 

Jan Ashirwad Yatra Live Update: जनआशीर्वाद यात्रेतून भाजपचं मुंबईत शक्तीप्रदर्शन 

Subscribe

जनआशीर्वाद यात्रेतून भाजपचं मुंबईत शक्तीप्रदर्शन


नारायण राणे यांची रथ लालबाग-परळमध्ये पोहोचला

- Advertisement -

नारायण राणे यांनी चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिवादन केले.


मुंबई महापालिका जिंकणे हीच माझी जबाबदारी – नारायण राणे

- Advertisement -

आमची शक्ती आमच्या विरोधकांना माहिती आहे – नारायण राणे


३२ वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही – नारायण राणे


आज बाळासाहेब ठाकरेंचा माझ्या डोक्यावर हात जरी नसला तरी आशीर्वाद आहे – नारायण राणे


जनआशीर्वाद यात्रेत भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी


स्वातंत्र्यवीर सावकरांच्या स्मारकाला नारायण राणे यांनी केले अभिवादन


शिवसेनेच्या सोडल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर नारायण राणे पोहोचले आहेत.


नारायण राणे दादरमधील शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले आहेत.


आमची जनआशीर्वाद यात्रा पाहून इतर सर्वपक्ष भयभीत झाले आहेत – नारायण राणे


महापालिकेत आता भाजपचे सरकार येणार – नारायण राणे


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगरमध्ये नारायण राणेंची यात्रा


वांद्रातल्या टीचर्स कॉलनीमध्ये नारायण राणे पोहोचले असून यावेळी माजी आमदार तृप्ती सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.


उद्धव ठाकरे राज्याला उद्ध्वस्त करायला निघालेत – नारायण राणे


महाराष्ट्रातील जनता सरकारला कंटाळली – नारायण राणे


नारायण राणे यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर मोठी गर्दी


नारायण राणे यांचं मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत


केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.


केंद्रीय मंत्री नारायण राणे थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहेत.


देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३९ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात ३ लाख ६४ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


पालघर जिल्हा मुख्यालयाचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघरला जाणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरा उपस्थित राहणार आहेत.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून दोन दिवशीय जन-आशिर्वाद यात्रा सुरू होणार आहे. आज सकाळी १० वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महारात यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून यात्रेला सुरुवात होणार आहे. या जन-आशिर्वाद यात्रेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पण आता नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेत बदल करण्यात आला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघ वरळीत जाणं टाळलं आहे. वरळीतील नारायण राणेंची सभा रद्द करण्यात आली आहे.


लससाठ्याअभावी मुंबईतील लसीकरणावर सातत्याने परिणाम होताना दिसत आहे. आज आणि उद्यामुंबईतील लसीकरण बंद राहणार आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -