Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : मंदिरालय सुरु होऊ शकतात मगं मंदिरं का नाही- देवेंद्र...

Live Update : मंदिरालय सुरु होऊ शकतात मगं मंदिरं का नाही- देवेंद्र फडणवीस 

Related Story

- Advertisement -

मंदिरालय सुरु होऊ शकतात मगं मंदिरं का नाही, इतर राज्यात मंदिरं सुरु – देवेंद्र फडणवीस


लालबागचा राजाची पहिली झलक आली समोर, कोविड 19 संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांमुळे यंदा लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीची उंची कमी करण्यात आली आहे. मात्र राजाचा दरबार मात्र नेहमी प्रमाणेच भव्य दिव्य असणार आहे.


- Advertisement -

लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनास बंदी, फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार 


लालबागच्या प्राणप्रतिष्ठापणेस विलंब, पोलीस आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा, दुकान बंद करण्याच्या निर्णयाविरोधात लालबागमधील दुकानदार, लालबागमधील ४७ दुकानं सुरु करण्यास परवानगी, एक दुकानातील २ लोकांचा पास मिळेल, याव्यतिरिक्त या भागात कोणालाही येता येणार नाही, मुंबईत पून्हा १४४ कलम लागू होईल. आरतीच्या वेळी १० लोकांना परवानगी- विश्वास नांगरे पाटील


- Advertisement -

भुजबळांच्या मुंबईच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा


अभिनेता सोनू सूदच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन


पुण्यातील केसरीवाड्यात मानाच्या बाप्पाचे आगमन, साध्यापद्धतीने पालखीतून बाप्पाचे आगमन


मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी बाप्पा विराजमान


मुख्यमंत्र्यांच्या घरी आज ११ वाजता बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.


मुंबईतील गणेशगल्लीचा बाप्पा विराजमान


कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला, वाजत गाजत बाप्पाचे आगमन


आपल्या लाडक्या बाप्पाला जल्लोषात घरी आणण्यासाठी लोक निघाले असून अनेक रस्त्यांवर गणपती बाप्पाचा जयघोष ऐकू येत आहे. कारखान्या जवळ लोकांची मोठ्या संख्येने गर्दी पहायला मिळत आहे. परळ, अंधेरी, या ठिकाणांवरुन लोक आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन निघालेले आहेत. हा उत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रमध्ये साजरा केला जातो. कोरोना आजार वाढल्यामुळे कमी लोक हा वर्षी बाप्पाला स्थापित करत आहे. पण जे कारखाने आहे तेथे मोठ्या संख्येन लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना नियमांना कुठे तरी पायदळी तुडवले जात आहे.


 

- Advertisement -