Live Update : कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

coronavirus update maharashtra unlock 25 september 2022 weather update pm modi us visit
coronavirus update maharashtra unlock 25 september 2022 weather update pm modi us visit

डोंबिवली अत्याचार प्रकरणात आरोपीची संख्या ३३ झाली आहे. २६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात दोघे विधिसंघर्ष बालक


आज राज्यात ३,३२० नव्या कोरोना रूग्णांचे निदान, तर आज ६१ कोरोनाबाधित रुग्णाांचा मृत्यू. आज ४,०५० रुग्णांनी केली कोरोनावर मात


शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या ८ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी मुदर तालवाला याला अटक केली


सुधारित ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांकडून स्वाक्षरी

राज्य सरकारने सुधारित अध्यादेश काल रात्री राज्यपालांना सुपूर्द केला होता. या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांकडून स्वाक्षरी


मुंबई महापौर किशोरी पेडणेकर बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल, बोरीवली महिला विनयभंग प्रकरणी शिवसेना आक्रमक


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोरीवली पोलीस ठाण्यात दाखल, बोरीवलीत भाजप पदाधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप


महापौर किशोरी पेडणेकर तक्रार करण्यासाठी बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल


भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्याची तक्रार आमदार आणि खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप समाजसेविकाने केला आहे. या विरोधात महिनाभरापूर्वी तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही. अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दाद मागितल्यावर बोरीवली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आ. शरद रणपिसे यांचे निधन


काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात घेणार फडणवीस यांची भेट, राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा, पोटनिवडणुकीत भाजप माघार घेण्याची शक्यता?


आत्ता उगीचच राज्य सरकारच्या बदनामीचे षडयंत्र सुरु आहे, इम्पेरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार- अजित पवार


नाशिकचे पोलिस आयुक्त राज ठाकरेंच्या भेटीला, दोघांमध्ये अर्ध्या तासापासून सुरु आहे चर्चा, मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये होर्डिंग काढण्यावरून काल झाली होती बाचाबाची,


अमेरिका दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेणार आहे. यासह जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांसारख्या जगभरातील देशांच्या पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत.


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, राज्य सरकारने मागितलेला डेटा केंद्र देणार का?


राज्यात महाविकास आघाडी सरकारविरुद्ध राज्यपाल असा वाद केल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर रंगलं. यातच एका लेटरमध्ये महिला असुरक्षिततेच्या मुद्द्यावरून कायदा आणि सुवस्थेच्या प्रश्नी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. अशातचं सामनाच्या अग्रलेखातून आज राज्यपालांना इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा धमकीवजा इशारा देण्यात आली आहे.