घरताज्या घडामोडीLive Update: अमरावती जिल्हात संचारबंदीच्या वेळेत बदल

Live Update: अमरावती जिल्हात संचारबंदीच्या वेळेत बदल

Subscribe

अमरावती जिल्हात संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. अमरावती शहरात दुपारी ३ नंतरच लॉकडाउन लावण्यात येत आहे.


राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालीश आरोप करणे बंद करावे, असा सला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मंत्री नवाब मलिक यांना दिला.

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं वादग्रस्त विधान गायकवाड यांनी केलं. यावर आता भाजपचे आमदार नितेश राणेंनी देखील पलटवार केला आहे. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर, अशा शब्दांत राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक आगीच्या घटना समोर आल्या आहेत. यात आज येथील समर्थ केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की,  यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीररित्या भाजले आहेत.

- Advertisement -

अपघातांच्या मालिका सुरुच असून आज एक दुर्दैवी घटना यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर घडली आहे. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमीला जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सध्या या घटनेचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.


‘भाभा, शताब्दी, भगवती आणि अग्रवाल या चार रुग्णालयातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनकरता वांद्रे येथील जम्बो रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन ऑक्सिजनची कमतरता कशी भरुन काढता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर वांद्रे येथील भाभा रुग्णालयाला ४० सिलेंडर, कुर्ला येथील भाभा रुग्णालयाला ७० सिलेंडर, शताब्दी रुग्णालयाला ६ सिलेंडर, अग्रवालला २५ आणि ट्रोमा केअर सेंटरला ८ सिलेंडर देण्यात आले आहेत. तसेच ज्याठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी लिक्विड प्लँट उभे करण्यात आले आहेत. तसेच पुढील दोन दिवसांत मुंबईतील परिस्थिती पूर्ववत होईल. मात्र, तोपर्यंत आपण बाटला सिलेंडरवर उपचार करत आहोत. तर सध्याची स्थिती ऑक्सिजनचा पुरवठा झालेला आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात असल्याची माहिती’, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.


देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजची ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे आता देशात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची कमी पडू लागल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, ही ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने देशातील सर्व राज्यांमध्ये १६२ ‘ऑक्सिजन जनरेशन प्लांट’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्सिजन प्लांटच्या मदतीने १५४.१९ मॅट्रीक टन उत्पादन शक्य होणार आहे. यामुळे ऑक्सिजनवर असणाऱ्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास मदत होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीत ऑक्सिजनचे बेड वाढवण्याचे देखील आदेश दिले आहेत.


‘ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? पोलिसांनी त्यांना चौकशी करण्यासाठी बोलवले होते, मग भाजपचे नेते वकिली करण्यासाठी का गेले?, असा सावल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. यासर्व प्रकारातून राज्यात कुठेतरी भाजपाची लोक साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू, अशी त्यांची भूमिका आहे’, असा आरोप नवाब मलिक यांनी भाजपवर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -