घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात ६७ हजार १२३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Live Update: राज्यात ६७ हजार १२३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासात ६७ हजार १२३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.


मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ८३४ कोरोनाबाधितांची नोंद

- Advertisement -


मुंबईतील कमोडीटी एक्सचेंज इमारतीला आग, ५ अग्रिशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल

- Advertisement -

मुंबईतील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी कलर कोड लागू,

लाल स्टिकर मेडिकल सर्व्हिस
ग्रीन स्टिकर खाद्यपदार्थ, भाजीपाला वाहने
पिवळा स्टिकर अत्यावश्यक सेवा आणि प्रेस मीडिया


रेमडेसिवीर इंजेक्शनच्या दर कमी करण्यात आले आहेत. आता सुधारित दरानुसार रेमडेसिवीरची विक्री केली जाणार आहे. केंद्र सरकारची मोठी घोषणा


pandharpur by election 2021: पंढरपूर पोटनिवडणूक मतदान, ५७.९८१ टक्के मतदानाची नोंद


महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन साठा मिळालाय, भ्रष्टाचारी राज्य सरकारमुळे जनतेचे हाल पीयूष गोयल यांचे टीकास्त्र


बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद हा विलगीकरणात असून तो उपचार घेत आहे.


गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला काही दिवस बाकी असताना ठरावधारकाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. ५४ वर्षीय सुभाष सदाशिव पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मागील आठवड्यात झालेल्या मेळाव्यानंतर ८ ठरावधारक कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. कोल्हापूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये सुभाष सदाशिव पाटील यांना दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य़ू झाला.


अमरावतीच्या मेळघाटातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सेमाडोह येथील महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी नातेवाईकांनी घेतली मांत्रिकाकडे धाव घेतली. मात्र ४५ वर्षीय महिलेचा भवई येथील मांत्रिकाकडे उपचारदरम्यान मृत्यू झाला.


कोरोनाचा संसर्ग देशात सातत्याने सुरू आहे. वाढत्या बाधितांच्या आकड्यांवरून जगभरात भीतीचे वातावरण आहे. बॉलिवूडमध्येही सुरक्षितता राखूनही अनेक सेलिब्रिटी कोरोनाचे बळी पडले आहेत. नुकतेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05)


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा आज पाचव्या टप्प्यातील मतदानास सुरु आहे. ४५ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ३४२ उमेदवारांचे भविष्य आज मतदार ठरवणार आहे.


देशात कोरोनाचा कहर सुरूच असून देशात गेल्या २४ तासात २ लाख ३४ हजारांहून अधिक नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ३४१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे दिवसभरात १ लाख २३ हजारांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीचे आज मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीत ३ लाख ४० हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह १९ उमेदवार रिंगणात आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान १२ तास केले जाणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ७ वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील असणाऱ्या १६ मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.


हवामान खात्याने पहिला मान्सून अंदाज जाहीर केला आहे. यंदा पाऊस ९६ टक्क्यांपासून १०४ टक्क्यांपर्यंत राहणार आहे, असे सांगण्यात आले आहे. हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचे आयएमडीने सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -