घरताज्या घडामोडीLive Update: काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना कोरोनाची लागण

Live Update: काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना कोरोनाची लागण

Subscribe

काँग्रेस खासदार शशी थरूर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

मध्यप्रदेश पाठोपाठ आता केरळ राज्य सरकारने देखील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस मोफत देण्याबाबत निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत मुंबईत ७ हजार ६८४ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ६२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ६ हजार ७९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख १ हजार ५९०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ५०१ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ३ हजार ५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ८४ हजार ७४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


आज रात्रीपासून गोव्या नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. आज रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे.


केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना कोरोना लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.


नाशिकमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. राज्यात अशी स्थिती पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे. जे रुग्ण गंभीर आहेत अशांना तात्काळ मदत केली पाहिजे तसेच काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करायचे असल्यास त्यांना शिफ्ट केले पाहिजे, मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.


नाशिक हॉस्पिटल गळती प्रकरणाची पहाणी करण्यास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ थोड्यात वेळात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात होणार हजर


नाशिक हॉस्पिटल गळती प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिली आहे.


ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रकृती सुधारल्यानंतरही अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल २ तास ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी कडून होत असल्याची माहिती मिळतेय.


डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळती प्रकरणात व्हेंटिलेटरवर असलेल्या २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.


झाकीर हुसेन रुग्णालयात एकूण १३१ रूग्ण उपचार घेत होते, त्यापैकी १५० रूग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते, अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळतेय.


व्हेंटिलेटरवरील १० ते ११ रूग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती – मनपा आयुक्त


या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करणार – नाशिक मनपा आयुक्त


नाशिक मनपा आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांची मागणी


नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी १० ते २३ रूग्णांचा तडफडून मृत्यू – नाशिक मनपा आयुक्त


नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये गळती


नाशिक शहरासह संपूर्ण राज्यात ऑक्सिजनची प्रचंड चणचण असताना नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकीला असलेल्या पाईपलाईनला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे हॉस्पिटलपरिसरात ऑक्सिजनचे पांढरे लोट दिसत होते. याच टाकीतून हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. ज्यावेळी गळती सुरु झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील १५ रुग्ण होते. परंतु गळतीमुळे अचानकपणे रुग्णांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. परिणामी तब्बल ११ अंत्यवस्थ रुग्णांचा दुर्देवी अंत झाला. उर्वरित रुग्णांना तातडीने नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात हलवण्यात आले.


या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत ११ पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.


भारत सरकारच्या निर्देशांचे पालन करून Serum Institute of India (SII) ने कोविशील्ड लसची किंमत जाहीर केली आहे सरकारी रूग्णालयांल प्रति डोस ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपये असणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुन्हा एकदा पवारांवर छोटी शस्त्रक्रिया झाली. गेल्या जवळपास २१ दिवसात शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे. यापूर्वी शरद पवार यांच्यावर १२ एप्रिलला पित्ताशयावर यशस्वीपणे पार पडली होती.


गेल्या २४ तासात देशात दोन हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा १ लाख ८२ हजार ५५३ वर पोहचला आहे. तर गेल्या २४ तासात देशात २ लाख ९५ हजार ०४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात आत्तापर्यंत १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ६७ हजार कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात आत्तापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ रुग्ण उपचारानंतर कोरोनातून बरे होऊ घरी परतले आहेत.


कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. किराणा खरेदी कऱण्याच्या निमित्ताने नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसताय. त्यामुळे किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला आहे.


रेमडेसिवीरचा तुटवडा पडू न देता रुग्णांपर्यंत हे इंजेक्शन सहजपणे पोहोचवण्यासाठी म्हणून केंद्राने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या निर्णयाअंतर्गत रेमडेसिवीरवरील आयात कर हटवण्यात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी रात्री यासंदर्भातील एक अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटवण्यात आला आहे.


राज्यात गेल्या २४ तासात ६२ हजार ९७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ५४ हजार २२४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३२ लाख १३ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण ६ लाख ८३ हजार ८५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.१४ टक्के झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -