Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: कर्नाटकात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू

Live Update: कर्नाटकात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू

Related Story

- Advertisement -

कर्नाटकात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. २१ एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून रात्री ९ वाजल्यापासून ते ४ मेपर्यंत सकाळी ६ वाजेपर्यंत कर्नाटकात नाईट कर्फ्यू असणार आहे.


- Advertisement -

देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचे आहे – मोदी


सर्व राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय शेवटचा ठेवाव – नरेंद्र मोदी


- Advertisement -

तरुणांनी आपल्या परिसरात कोरोना संदर्भात जागृकता करावी – मोदी


मजुरांनी जिथे आहे, तिथेच थांबा, स्थलांतरीत होवू नका – नरेंद्र मोदी


आरोग्य सुविधा कमी पडू देणार नाही – नरेंद्र मोदी


श्रमिकांना वेगाने लस मिळणार – मोदी


कोरोना लसीकरणात भारत अग्रेसर – मोदी


देशात आतापर्यंत १२ कोटी जणांचे लसीकरण पार पडले – मोदी


जगातील सर्वात स्वस्त कोरोना लस भारतात आहे. – मोदी


ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत – मोदी


देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. – नरेंद्र मोदी


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशासमोर आणखीन एक संकट – नरेंद्र मोदी


लाईव्हच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे जीव गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहली


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशवासियांशी संवाद साधणार आहेत.


गेल्या २४ तासांत नागपुरात ६ हजार ८९० रुग्ण आढळले असून ९१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ५ हजार ५०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ३६ हजार ३६०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६ हजार ४७७ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ५८ हजार १९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


मुंबईत गेल्या २४ तासांत ७ हजार २१४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ९ हजार ६४१ रुग्ण बरे होऊन गेले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ९३ हजार ९०६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ४३९ जणांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात लॉकडाऊनसह जिल्हाबंदीचा निर्णय घेण्याची शक्यता – एकनाथ शिंदे


दहावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत बैठकीत एकमत झाले असून बारावीच्या परीक्षा होणार आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.


राज्यात काही तासांत कडक लॉकडाऊन लागणार असून काही वेळात गाईडलाईन्स जाहीर होतील – मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख


राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.


पिंपरी चिंचवड पोलिसांनी हिंजवडी परिसरात बनावट आरटी-पीसीआर रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींवर आयपीसीच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोना लागण झाली आहे. मुंबईतील लिलावती रुग्णालयात अमित ठाकरे यांना दाखल करण्यात आले आहे.


अभिनेता किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन झाले असून मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे शरद पवार यांची भेट घेणार असून ऑक्सिजनबाबत चर्चा करणार आहे. केंद्राकडे पवारांनी विनंती करुन तोडगा काढण्याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.


अलाहाबाद हायकोर्टाने उत्तर प्रदेशातील पाच शहरांमध्ये स्वत:हून लॉकडाऊन जाहीर केला. परंतु लॉकडाऊन लावणार नाही असं म्हणत योगी सरकारने हायकोर्टाचा निर्णय लागू करण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाच्या या आदेशाविरोधात योगी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. सरकार हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज आपली बाजू मांडणार आहे.


गेल्या २४ तासात आज २ लाख ५६ हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळ्याचे समोर आले आहे. या कालावधीत १ हजार ७६१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १ लाख ५४ हजार ७६१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात न घालता कित्येक परिक्षा आतापर्यंत रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. CBSE दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता ICSE बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबईत २००६ मध्ये झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचा नागपूरच्या कारागृहात मृत्यू झाला. कोरोना संसर्गानंतर कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी याने प्राण सोडले. कमाल अहमद हा मूळ बिहारचा रहिवासी होता.


देशातील कोरोनाव्हायरसच्या कहर दिवसेंदिवस वाढत असताना, अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी सतत बैठक घेत आहेत. आज, मंगळवारी देखील पंतप्रधान मोदी लस उत्पादकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. यावेळी, कोरोना स्थिती आणि लसीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. आज सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मुंबईतील मुंबा देवी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. अष्टमीच्या निमित्ताने मुंबईकर भाविकांनी घेतले बाहेरूनच दर्शन.


राज्यात कठोर निर्बंध लागू करुनही कोरोनाच्या प्रादुर्भाव नियंत्रणात नसल्यामुळे आता ठाकरे सरकार अत्यावश्यक सेवांच्या यादीत असलेल्या किराणा दुकाने सुरु ठेवण्याची वेळही कमी करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. संभाव्य निर्णयानुसार किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच खुली राहणार असल्याचे सांगितले जात आहे.


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढतआहे. गेल्या २४ तासात ५८ हजार ४१२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ५२ हजार ४१२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३९ लाख ५९ हजार २४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण ६ लाख ७६ हजार ५२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.४ टक्के झाले आहे. राज्यात सोमवारी एकूण ३५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या मृत्यूदर १.५६ टक्के आहे.

- Advertisement -