Live Update: गोव्यात २४ तासांत १,४१० रुग्णांची वाढ, २१ जणांचा मृत्यू

Maharashtra Breaking News

गोव्यात गेल्या २४ तासांत १ हजार ४१० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच ४६१ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले. आता गोव्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७२ हजार २२४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९६४ जणांचा मृत्यू झाला असून ६१ हजार ३२ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्याा १० हजार २२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


आज मुंबईत ७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज ७ हजार ४१० नवे कोरोना रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेली रुग्णसंख्या ही ६ लाख ९ हजारांच्या घरात पोहचली आहे. मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत आणखी वाढ होत आहे.


गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख ९४ हजार ८४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६२ हजार ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा


राज्यातल्या लॉकडाऊनला सुरुवात सविस्तर वाचा 


आता पश्चिम बंगालमध्येही १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस मोफत देणार आहे. ५ मेनंतर ही कोरोनाची मोफत लस देणार असल्याची माहिती पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी ट्वीट करून दिली आहे.


राज्यातील लॉकडाऊनसाठी राहिला १ तास सविस्तर वाचा 


कोरोना स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्च स्तरीय अधिकाऱ्यांची बैठक उद्या बोलावली आहे. त्यामुळे उद्याचा पश्चिम बंगाल दौरा मोदींनी रद्द केला आहे.


नाशिक मनपाच्या पंचवटी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे कोरोना प्रतिबंधक लस घेतली


काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे, काल रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आयसोलेट असून उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


देशात कोरोना बाधितांचा आकडा ३ लाख १४ हजारांच्या पार तर २ हजारांहून अधिकांचा एका दिवसात कोरोनाने बळी


सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचे गुरुवारी सकाळी कोरोनाने निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर गुरुग्राममधील मेदांता खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष एक पत्रकार होते, ते दिल्लीतील एका प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी सीनिअर कॉपी एडिटर म्हणून काम करत होते. वयाच्या ३४ व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने मित्र परिवार कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे.


नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सविस्तर वाचा


नाशिक शहरातील नारायणी आणि सिक्स सिग्मा या दोन मोठ्या रुग्णालयातील ऑक्सिजन साठा काही तास पुरेल इतकाच असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे रुग्णांच्या नातलगांना रुग्ण हलविण्याकरिता हॉस्पिटल प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहे.


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीचे सहाव्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. ४ जिल्ह्यांमधील ४३ मतदारसंघांचा समावेश आहे. उत्तर बंगालमधील उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण बंगालमधील नदिया, दक्षिण २४ परगना आणि पूर्व बर्दवानमधील एकूण ४३ जागांवर मतदान होत आहे. कडेकोट सुरक्षा दरम्यान सकाळी ७ ते सायंकाळी ६,३०दरम्यान हे मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ पैकी ११२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचे ३ टप्पे अद्याप पार पडायचे आहेत.


राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून गेल्या २४ तासांत राज्यात ५६८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल ६७ हजार ४६८ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ५४ हजार ९८५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ४० लाख २७ हजार ८२७ वर पोहोचला आहे. त्यातील ३२ लाख ६८ हजार ४४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ६१ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे.