Coronavirus : महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या – राजेश भूषण

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला असून, कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. दरम्यान, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशात कोरोनाचा कहर सुरु असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत पहिल्या 10 राज्यांमध्ये आहेत.

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला असून, कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. दरम्यान, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशात कोरोनाचा कहर सुरु असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत पहिल्या 10 राज्यांमध्ये आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याच वेळी, अवघ्या 4 आठवड्यांत आशियामधून जागतिक योगदानातही वाढ दिसून आली आहे,असे राजेश भूषण यांनी सांगितले आहे.

राजेश भूषण म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश ही चिंंताजनक राज्ये झाली आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथके पाठवली असून, सतत परिस्थितीचा आढावा घेत आहोत. त्यांनी असेही म्हटले आहे की कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील सक्रिय रुग्णांच्या तुलनेत मृत्यूची दरात घट झालेली पाहायला मिळत आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, सध्या जगात कोविडची चौथी लाट दिसून येत आहे. गेल्या 1 आठवड्यात दररोज 29 लाख केसेसची नोंद झाली. गेल्या 4 आठवड्यांत आफ्रिकेत कोविडची प्रकरणे कमी होत आहेत. आशियामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. युरोपमध्येही केसेस कमी होत आहेत. भारतात दुसर्‍या लाटेत लसीकरण केलेली लोकसंख्या 2 टक्के होती, आता तिसर्‍या लाटेत लसीकरण केलेली लोकसंख्या 72 टक्के आहे.या कोरोनासारख्या भयानक महामारीवर मात करण्यासाठी जगभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. याच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लढा देण्यासाठी भारतात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. भारतात कोरोना विरोधी लसीकरणाला वर्षपूर्ती झाली असून, आतापर्यंत 157 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र,देशातील एकूण एक नागरिकांना लसीचा डोस देण्याचे लक्ष्य आहे.


हे ही वाचा – Pakistan Blast: पाकिस्तानच्या लाहौर शहरात स्फोट, ३ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी