Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश बेळगावात फडणवीसांच्या विरोधात एकीकरण समिती आक्रमक, दाखवले काळे झेंडे

बेळगावात फडणवीसांच्या विरोधात एकीकरण समिती आक्रमक, दाखवले काळे झेंडे

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात प्रचारासाठी पोहोचले होते. फडणवीस हे बेळगावातील टिळक चौकात पोहचताच त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केले.

कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काल बुधवारी (ता. 03 मे) बेळागावात एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत यांनी हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निपाणी मतदारसंघात प्रचाराला हजेरी लावली होती. तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात प्रचारासाठी पोहोचले. फडणवीस हे बेळगावातील टिळक चौकात पोहचताच त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केले. कर्नाटकात एकीकरण समितीच्या विरोधात फडणवीस आल्याने त्यांच्याविरोधात समितीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांकडून एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याती माहिती समोर आली आहे.

पुढील आठवड्यात 10 मे ला कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना काहीच दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बेळगाव उत्तरचे उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेसाठी हजेरी लावली. पण यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. तसेच फडणवीस येण्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यासही सुरूवात केली.

- Advertisement -

हेही वाचा – पोलिसांच्या क्रूरतेचा तीव्र शब्दांत निषेध; शरद पवारांनी लक्ष घालण्याचे गृहमंत्र्यांना केले आवाहन

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवताच त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. समितीच्या 10 कार्यकर्त्यांना बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. तर निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Karnataka Police) धक्काबुक्की केल्याचेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्व मतदारसंघात एकच उमेदवार दिल्यामुळे मराठी भाषिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

तसेच महाराष्ट्र एकीकरम समितीच्या उमेदवारांना या निवडणुकीत प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येऊ नये, अशी मागणी करण्यात समितीच्या सदस्यांकडून करण्यात आलेली असताना देवेंद्र फडणवीस बेळगावात आल्याने एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

- Advertisment -