घरदेश-विदेश'गुप्त मतदान नको, लाइव्ह टेलिकास्ट करा' – सुप्रीम कोर्ट

‘गुप्त मतदान नको, लाइव्ह टेलिकास्ट करा’ – सुप्रीम कोर्ट

Subscribe

मतदान गुप्त नसून त्याचे थेट लाइव्ह प्रक्षेपण करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. या निर्णयानुसार २७ नोव्हेंबर रोजीच बहुमत चाचणी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाय, बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी व्हायला हवेत, असे देखील न्यायालयाने बजावले आहे. महत्त्वाचीबाब म्हणजे हे मतदान गुप्त नसून त्याचे थेट लाइव्ह प्रक्षेपण करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, बहुमत चाचणीसाठी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची आवश्यकता नसून त्याआधीच बहुमत चाचणी घ्यायला न्यायालयानं सांगितले आहे. त्यामुळे आता विधानसभेत हंगामी अध्यक्षांच्या निगराणीखालीच बहुमत चाचणी घेतली जाणार आहे.

लोकांना चांगले सरकार मिळणे हा मुलभूत अधिकार

‘लोकशाही मूल्यांचे रक्षण होणे आवश्यक आहे. लोकांना चांगले सरकार मिळणे हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता येत्या २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आम्ही देत आहोत,’ असे न्यायाधिशांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

तसेच उद्या बहुमतासाठी जे मतदान होणार आहे ते मतदान हे गुप्त पद्धतीने न घेता थेट घेण्यात यावे, तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात यावे, असेही न्यायलयाने स्पष्ट केले आहे. संबंधित निकाल देताना न्यायलयाने बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा – ‘आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू’; दानवेंचा दावा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -