घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात ३४ हजार ८४८ कोरोनाबाधितांची नोंद, ९६० रुग्णांचा मृत्यू

Live Update: राज्यात ३४ हजार ८४८ कोरोनाबाधितांची नोंद, ९६० रुग्णांचा मृत्यू

Subscribe

खासदार राजीव सातव यांना सायटोमॅगीलो विषाणूचा संसर्ग, राजेश टोपे पुण्याला जाऊन घेणार भेट


राज्यात ३४ हजार ८४८ कोरोनाबाधितांची नोंद, ९६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ५९ हजार ७२ कोरोनामुक्त रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

- Advertisement -

मुंबईकरांना दिलासा, गेल्या २४ तासात १ हजार ४४७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. २४ तासात बाधित रुग्ण – १४४७ २४ तासात बरे झालेले रुग्ण – २३३३ बरे झालेले एकूण रुग्ण – ६३४३१५ बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९२% एकूण सक्रिय रुग्ण- ३६६७४ दुप्पटीचा दर- २१३ दिवस कोविड वाढीचा दर (८ मे -१४ मे)- ०.३२%

- Advertisement -

आरोग्यमंत्री राजेश टोपे उद्या पुण्यातील जहांगीर रुग्णालयात जाऊन राजीव सातव यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती टोपे यांनी दिली आहे.


उल्हासनगरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, ११ जणांना वाचवण्यात यश, प्रशासनाकडून बचावकार्य सुरु


म्युकर मायकोसिसचे संक्रमण हवेतून होऊ शकते अशी माहिती एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. तसेच म्युकरमायकोसिसचे संक्रमण माती आणि हवेतून होऊ शकते.


आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ६ तासांत तौक्ते चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळ आणि पुढील १२ तासांत अत्यंत तीव्र चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे. कोकण किनारपट्टीला या चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागलेला आहे. त्यामुळे त्याची तीव्रता दुपारनंतर अधिक होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर BMC ची खबरदारी

मुंबई उपनगरातील मुलुंड कोविड सेंटरमधून ऑक्सिजनवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना इतर रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणून रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत किंवा ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना स्थलांतरित केले जाणार, असल्याचे सांगितले आहे.


तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकरणार नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली. मात्र चक्रीवादळामुळे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असून हे चक्रीवादळ गोव्यापासून ३५० किमी अंतरावर आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ तासाला अधिकच सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील ३ दिवस मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.


दुपारी ३ वाजता उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आरोग्य मंत्र्यांशी कोरोना परिस्थिती आणि त्यांच्या राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.


येत्या १२ तासात तोक्ते चक्रीवादळ अधिक तीव्र होणार आहे. आज गोवा आणि कोकणातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हे वादळ १८ मे ला दुपारच्या सुमारास पोरबंदर ते नलिया किनारपट्टीवर दाखल होणार. तोक्ते चक्रीवादळ पणजीपासून ३५० किमी अंतरावर असल्याची माहिती मिळतेय.


गोव्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांचा वैद्यकीय ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू होत आहे. हीच गंभीर बाब लक्षात घेता, गोवा मेडिकल कॉलेज आणि इस्पितळात २० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टँक बसविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले


पंतप्रधान नरेंद्र मोदी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वादळाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सरकार आणि एनडीएमएमधील उच्च अधिकारी सहभागी होणार आहेत.


पूर्वेकडील आणि दक्षिणपूर्व अरबी समुद्रात गुजरात आणि दीव किनारपट्टीसाठी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे . आज आणि उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन जिल्ह्यात ऑरेंज झोन जारी करण्यात आला आहे.


येत्या २४ तासांत तौक्ते चक्रीवादळात आणखी तीव्रता येण्याची शक्यता आहे. १७ मे रोजी सकाळी उत्तर-वायव्य दिशेने हे वादळ वेगाने सरकणार असून ते गुजरातला धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सोसाट्याचा वारा सुटणार असून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तौक्ते या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी काळे ढग दाटले आहेत. पहाटेच्या सुमारास दक्षिण मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.


राज्याच्या कित्येक भागात मुसळधार पाऊस सुरू असून, केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील दृश्ये. या जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी केला आहे.


तौक्ते या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप बेटसमूह, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी आणि त्यालगतचा भाग, दक्षिण कोकण आणि गोवा, गुजरात या भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.


अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सुचना प्रशासनास दिल्या. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असेही मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला


देशात कोरोनाचा कहर सुरू असून गेल्या २४ तासात ३ लाख २६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -