Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत गेल्या २४ तासात २ हजार ११६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासात २ हजार ११६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Related Story

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासात २ हजार ११६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आज ४ हजार २९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज ६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजार ८ इतकी झाली आहे.


- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ४६ हजार ७८१ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५७ हजार ८०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात आज ८१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


- Advertisement -

राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.


INS तरकश जहाज २० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन क्रायोजेनिक कंटेनर्स आणि २३० ऑक्सिजन सिलेंडर घेऊन मुंबईत दाखल झाले आहे. समुद्र सेतू या मोहिमेअंतर्गत आलेला सर्व माल महाराष्ट्र नागरी प्रशासनाकडे सोपविण्यात आला आहे.


गोव्यात गेल्या २४ तासात २ हजार ८६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज ७० जणांचा मृत्यू झालाय. तर गेल्या २४ तासात गोव्यामध्ये २ हजार ८४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दया नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहिती नुसार दया नायक आहे त्याच पदी कायम राहणार. दया नायक यांची गोंदीयाला बदली करण्यात आली होती.गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात बदली करण्यात आली होती.थोड्याच वेळात आदेशाची प्रत जारी करण्यात येणार आहे. (सविस्तर वाचा )


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आण्णा बनसोडेंवर गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. पण सुदैवाने आण्णा बनसोडे सुखरुप असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार आण्णा बनसोडेंच्या दिशेने ३ गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे.


राज्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ होणार की नाही हे आजच्या मंत्रिमंडळच्या बैठकीत ठरणार.


पुणे म्हाडा लॉटरीमध्ये एक महिन्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने हा निर्णय घेतला आहे. १३ जूनपर्यंत म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करता येणार आहे.


जागतिक परिचारिका दिनीच शिर्डीतील परिचारिकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आंदोलक परिचारिकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले आहे.


लसीकरणाच्या तुटवड्यामुळे नागपुरमधील अनेक लसीकरण केंद्र बंद


केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यासोबत काही राज्यातील आरोग्यमंत्र्यांची बैठक होणार


गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ४८ हजार ४२१ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४ हजार २०५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ५५ हजार ३३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सविस्तर वाचा 


आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३० कोटी ७५ लाख ८३ हजार ९९१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी १९ लाख ८३ हजार ८०४ नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहेत.


आजपासून नाशिकमध्ये लॉकडाऊन सुरू झाला असून २२ मेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. पण बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.


जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही देशांमध्ये कोरोना दुसरी, तिसरी लाट आली आहे. भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ कोटी ३ लाख १९ हजार पार झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३३ लाख ३० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १३ कोटी ८० लाख ५३ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात काल ७९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हजार ९५६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्याची वाढती आकडेवारी धडकी भरवणारी असली तरी गेल्या २४ तासांत ७१ हजार ९६६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असल्याची दिलासादायक बाब आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -