घरताज्या घडामोडीLive Update: गोव्यात २४ तासांत ३,८६९ नवी रुग्णवाढ, ५८ जणांचा मृ्त्यू

Live Update: गोव्यात २४ तासांत ३,८६९ नवी रुग्णवाढ, ५८ जणांचा मृ्त्यू

Subscribe

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियाला बदली


गोव्यात मागील २४ तासांत ३ हजार ८६९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या गोव्यात २९ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

- Advertisement -


मुंबईत गेल्या २४ तासांत ३ हजार ५६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

- Advertisement -


दिल्लीत गेल्या २४ तासांत १९ हजार १३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २० हजार २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ९० हजार ९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


राज्यात १८-४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी विकत घेण्यात आलेली कोवॅक्सिन ४५ वर्षावरील नागरिकांना देण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी ४५ वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नसल्याने राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.


राज्यातील आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण १२ हजार पदे, ब वर्गातील २ हजार पदे आणि २ हजार विशेषज्ञांचा समावेश असणार आहे. येत्या आठवड्याभरात यासंदर्भातली शासन पातळीवरची निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


लवकरच मुंबई महानगरपालिका इमारतींमध्ये जाऊन लसीकरण करणार असून, त्याबाबत विचार सुरु असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. ज्यांच्या सोसायटीमध्ये लसीकरणाला अनुसरून जागा असेल तिथे लसीकरण केले जाईल, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. त्यामुळे लवकरच मुंबईत इमारतींमध्ये जाऊन लसीकरण होणार असल्याची शक्यता


महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, ७ किलो युरेनियम जप्त करत दोघांना अटक

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून ७ किलो युरेनियम जप्त करत दोघांना अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या युरेनियमची किंमत २१ करोड ३० लाख इतकी आहे. ही कारवाई एटीएसच्या नागपाडा युनिट कडून करण्यात आली आहे. तर या कारवाईत जिगर पांड्या (२७) आणि अबू ताहीर (३१) या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय.


माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तिसरी याचिका दाखल. अट्रोसिटीचा गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ४ जून रोजी सुनावणी होणार आहे.


देशात गेल्या २४ तासात ४ लाख १२ हजार २६२ नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद कऱण्यात आली आहे. याकाळात ३ हजार ९८० जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिलासादायक म्हणजे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान ३ लाख २९ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात केली आहे. (सविस्तर वाचा)


राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष अजित सिंह यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अजित सिंह आणि त्यांची नात २२ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी फुप्फुसांमध्ये इन्फेक्शनमुळे अजित सिंह यांचे निधन झाले आहे. दरम्यान त्यांच्या नातीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.


मुंबई उच्च न्यायालयात आज वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी पार पडणार आहे. राज्य सरकारने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांनी याचिका दाखल केली आहे. तर सीबीआयकडून दाखल झालेला एफआयआर रद्द करण्यासाठी अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारने याचिका दाखल केली आहे.


जोगेश्वरी पूर्व येथे आजपासून मनपाकडून लसीकरण केंद्र सुरू

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या सुचनेनुसार आजपासून मातोश्री आर्टस आणि स्पोर्टस क्लब येथे मुंबई महानगर पालिकेच्या के पूर्व विभागातफेॅ लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षा वरील २०० जणांनाच दरदिवशी लसीचा दुसरा डोस या लसीकरण केंद्रावर देण्यास येणार आहे. शुक्रवार पासून दरदिवशी सकाळी ९ ते ५ यावेळात हे लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे. लस घेण्यासाठी येताना जनतेने आपले आधार कार्ड घेऊन यावे. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात लवकरच अन्य ठिकाणीही लसीकरण केंद्र मनपाकडून सुरू करण्यात येणार आहे.


आसारामला कोरोनाचा संसर्ग, प्रकृती बिघडल्याने ICU मध्ये दाखल

राजस्थान जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या आसारामला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर बुधवारी रात्री प्रकृती बिघडल्याने त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आसारामची तीन दिवसाआधीच कोरोना चाचणी केली गेली होती आणि बुधवारी संध्याकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आसारामने प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते. कोरोनामुळे ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्याला ICU मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -