घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात गेल्या २४ तासात ४८ हजार ४०१ कोरोनाबाधितांची नोंद

Live Update: राज्यात गेल्या २४ तासात ४८ हजार ४०१ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

गोव्यात कोरोनाचा हाहाकार, गेल्या २४ तासात २ हजार ६३३ कोरोनाबाधितांची नोंद तर ६७ रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

गेल्या २४ तासात ४८ हजार ४०१ कोरोनाबाधितांची नोंद

आज ६०,२२६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४४,०७,८१८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.% एवढे झाले आहे. आज राज्यात ४८,४०१ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ५७२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

- Advertisement -

राज्यसभेचे खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचे कोरोनामुळे निधन, सात दिवसांपुर्वी झाली होती कोरोनाची लागण, दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.


मुंबईत गेल्या २४ तासात २ हजार ४०३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर गेल्या २४ तासात ६८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत बाधितांच्या संख्येपेक्षा एकाच दिवसात ३३७५ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळताना दिसत आहे.


दिल्ली प्राणिसंग्रहालयातील अमन नावाच्या सिंहाचा ह्रदयविकाराने मृत्यू


एटीएसने जप्त केलेली युरेनियम प्रकरणचा तपास NIA ने घेतला आहे. एटीएसने दोघांना अटक करत ७ किलो युरेनियम जप्त केल होतं. एटीएसने जप्त केलेल्या युरेनियमची किंमत २१ कोटी ३० लाख इतकी होती. एटीएसने जिगर पांड्या आणि अबू ताहीर यांना अटक केली आहे.


मुंबईतील गोरेगाव नेस्को कोविड सेंटरवर नर्स आणि डॉक्टरांचा संप .राहणं, खाणं आणि पिण्याच्या पाण्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण करा, अशी कोविड योद्ध्यांची मागणी. वरिष्ठांकडे तक्रार करुनही दखल घेतली न गेल्याचा नर्स आणि डॉक्टरांचा यंत्रणेवर आरोप.


कोरोना नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी केळवे ग्रामपंचायतीने रिसॉर्ट मालकाला दंड ठोठावला असून पोलिसांनी रिसॉर्ट मालकावर गुन्हा दाखल दाखल केला आहे. ग्रामपंचायतीने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून वर-वधू पिता ,रिसॉर्ट मालक, कॅटरर्सवर केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.


कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात उद्या सोमवार १० मेपासून १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला कोवीड चा धोका व वाढती रुग्णसंख्या यामुळे कल्याणचे तहसीलदार दिपक आकडे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे या कडक निर्बंधांबाबत प्रस्ताव दिला होता. त्याला ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजुरी दिली.


दोन दिवसांच्या जोरबैठकांनंतर अखेर आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी हिंमत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या भाजप विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत हिंमत बिस्वा सरमा यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली. सरमा हे आज दुपारी ४ च्या सुमारास राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा, करणार असल्याची माहिती.


देशात गेल्या २४ तासात ४ लाख ३ हजार ७३८ नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद कऱण्यात आली आहे. याकाळात ४ हजार ०९२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिलासादायक म्हणजे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान ३ लाख ८६ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात केली आहे.


ऑनलाईन नोंदणी केलेल्या मुंबईकरांनाच आज कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार

आज मुंबईतील लसीकरण केंद्र उशीरानं सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच आज मुंबईकरांना कोवॅक्सिनचा डोस देण्यात येणार नाही. केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच आज कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे.


आज सकाळी ११.०० वाजता कृष्णकुंज येथे आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत.


कोल्हापुरात लॉकडाऊनचं उल्लंघन, २२ व्यावसायिकांवर गुन्हा

कोल्हापूरात लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर अत्यावश्यक सेवेत नसताना दुकान उघडणं, वेळेच्या नियमांचं उल्लंघन तसेच पार्सल सेवा न देता जागेवरच खाद्यपदार्थ विक्री करणं व्यावसायिकां महागात पडंल आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कारवाईच्या सूचना दिल्या असताना नियमांचं उल्लंघन करण्यात आले आहे.


मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय शनिवारी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा आढावा मुख्य सचिव उद्या सोमवारपासून संबंधित विभागाच्या सचिवांकडून घेतील, असाही निर्णय बैठकीत झाला.


सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत राज्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेशही दिले. मात्र, फक्त आदेश न देता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून राज्यांना होणारा ऑक्सिजन व औषधांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या या समितीमध्ये महाराष्ट्रातील दोन डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फोर्टिस रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर मेडिसीन अँड आयसीयूचे संचालक डॉ. राहुल पंडित आणि हिंदुजा रुग्णालयाचे कन्सल्टेंट चेस्ट फिजिशियन डॉ. जरीर एफ उदवाडिया यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -